लखीमपूरचे पडसाद : महाराष्ट्र बंद का केला ते सांगा!!; मुंबई हायकोर्टाची सरकारला ताकीद

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. आता या महाराष्ट्र बंदबाबत तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र बंदबाबत उत्तर द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी सक्त ताकीद हायकोर्टाने ठाकरे – पवार सरकारला दिली आहे. Lakhimpur’s repercussions: Explain why Maharashtra was closed !!; Mumbai High Court warns govt

लखीमपूर खिरीमधील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकराने 11 ऑक्टोबर 2021 रोजी एकदिवसीय बंद पुकारला होता. त्यामुळे या बंदमुळे राज्याचे 3000 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करीत, माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांच्यासह अन्य काही जणांनी आव्हान याचिका न्यायालयात दाखल केली होती.



मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने या बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढच्या तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण द्यावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी सक्त ताकीद हायकोर्टाने दिली आहे.

– 3000 हजार कोटींचे नुकसान

इतिहासात पहिल्यांदाच राज्यात सत्तेत आलेले पक्ष बंदमध्ये सहभागी झाले. या एकदिवसीय बंदमुळे राज्याचे 3000 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा दावा करीत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. तसेच, या बंदमुळे राज्यभरात काम करणा-यांच्या मूलभूत अधिकांरावर गदा आली. मुंबईसारख्या शहरावर याचा मोठा परिणाम झाला, असे याचिकेत म्हटले आहे. त्याची दखल घेत हायकोर्टाने ठाकरे – पवार सरकारला उत्तर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.

Lakhimpur’s repercussions: Explain why Maharashtra was closed !!; Mumbai High Court warns govt

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात