लेडी सिंघम तेजस्वी सातपुते यांना’नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार


सोलापूर जिल्ह्यातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचाही समावेश आहे. Lady Singham Tejaswi Satpute will be honored with ‘Navbharat Governance Award’


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : शनिवारी (ता. २०) मुंबईतील राजभवनात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार सोहळा होणार आहे.या सोहळ्यात राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते ‘नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचाही समावेश आहे.



कोण आहेत तेजस्वी सातपुते

तेजस्वी सातपुते या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावच्या. आई कृष्णाबाई प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या तर वडील बाळासाहेब व्यावसायिक. २००९ साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती. दुसर्‍या प्रयत्नात २०१२ साली देशात १९८ क्रमांक मिळवून त्या आयपीएस झाल्या. स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्यावर त्यांचे लग्न किशोर रक्ताटे यांच्या सोबत झाले.तेजस्वी सातपुते यांनी ऑक्‍टोबर २०२० मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या एसपी म्हणून पदभार घेतला.

तेजस्वी सातपुते यांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’

कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाउनमध्ये तेजस्वी सातपुते या कोरोनाबाधित झाल्या होत्या .मात्र तेजस्वी सातपुते यांनी ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे त्यांनी शासकीय सेवा सुरूच ठेवली . सोलापूर जिल्ह्यात काम करताना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ने अनेकांना अवैध धंद्यांपासून दूर करून स्वतःच्या चांगल्या व्यवसायाकडे वळवले.विशेष करून हातभट्टी दारू गाळणाऱ्यांचे परिवर्तन झाले.याची राज्यभरात जोरदार चर्चा आहे.

Lady Singham Tejaswi Satpute will be honored with ‘Navbharat Governance Award’

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात