प्रतिनिधी
कराड : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे कराडमध्ये ९६ व्या वर्षी आज निधन झाले. Krantisingh Nana patil’s daughter hausatai patil passed away
क्रांतीवीरांगना हौसाताई या वयाच्या २० व्या वर्षापासून प्रतिसरकारच्या चळवळीत सक्रिय होत्या. हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सर्वस्व पणाला लावून काम केले होते. गोव्याच्या तुरूंगात अडकलेला क्रांतिकारक बाळ भिडे याला सोडवून आणण्यासाठी ओली बाळंतीण असताना मध्यरात्रीच्या वेळी त्यांनी मांडवी नदी पोहून गोव्यात प्रवेश केला आणि बाळ भिडेला सोडवून महाराष्ट्रात आणले होते.
अखेरपर्यंत त्यांचे विट्यातील घर हे सर्व कष्टकरी कामगार चळवळीचे आधार – प्रेरणास्थान राहिले होते. हौसाताईंच्या निधनाने प्रतिसरकारच्या क्रांतिकारी चळवळीतील अखेरचा प्रत्यक्ष दुवा काळाच्या पडद्याआड गेला आहे. हौसाताई यांच्या पार्थिवावर हणमंत वडिये गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत .
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App