कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीला अचानक आग लागली. ही आग सायंकाळी पाचच्या सुमारास लागली.Kolhapur: Four-wheeler suddenly caught fire; Hotelier dies in fire
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर बोरपाडले घाटात भरधाव कारला अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली असून यामध्ये दुर्दैवाने वाहन चालकाचा होरपळून मृत्यू झाला. अभिजित पांडूरंग ठाणेकर (रा. आजरा) असे या चालकाचे नाव आहे. तो एक हॉटेल व्यावसायिक होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीला अचानक आग लागली. ही आग सायंकाळी पाचच्या सुमारास लागली. या आगीत चारचाकी गाडी भस्मसात झाली असून चालकाचा सुद्धा होरपळून मृत्यू झाला.
शॉर्ट सर्कीटमुळे गाडीत आग लागलेची माहिती मिळाली. स्थानिकांसह कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक विभागाने या गाडीला लागलेली आग विझवली.
घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केला. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App