किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट , हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची केली मागणी,1500 कोटींचे कंत्राट रद्द करून दाखवले


१ हजार ५००० कोटींचा भ्रष्टाचार आहे. म्हणून हसन मुश्रीफ यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.Kirit Somaiya’s assassination, demand for Hasan Mushrif’s resignation, cancellation of Rs 1,500 crore contract


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या मे. जयस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिलेले १ हजार ५०० कोटिंचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहे. हा १ हजार ५००० कोटींचा भ्रष्टाचार आहे. म्हणून हसन मुश्रीफ यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

या आधीही सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर विविध आरोप केले आहेत. राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये तसेच या विभागाच्या अधिनस्त इतर शासकीय कार्यालयांमध्ये जीएसटी, टीडीएस, इन्कमटॅक्स वरील टीडीएस, टीसीएस तसेच लेबर सेस, रॉयल्टी आणि इन्शुरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा करण्याकरिता मे. जयस्तुते मॅनेजमेंट संस्थेची १० मार्च २०२१ रोजी निवड करण्यात आली होती, असेही सोमय्या यांनी सांगितले.ही कंपनी २०१२-१३ मध्ये स्थापन झाली. असली तरी या कंपनीत मागील ८ वर्षात काहीही व्यवसाय, उलाढाल नव्हती. हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांनी ही कंपनी ८ महिन्या पूर्वीच विकत घेतली होती, असा आरोप सोमय्या यांनी केला.या वेळी सोमय्या यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला.

त्यांच्या मुरुड-दापोली येथील अनधिकृत साई रिसॉर्ट संबंधात लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू झाली, असल्याची माहिती त्यांनी दिली. या संबंधात लोकायुक्त यांनी चौकशीसाठी गृह सचिवांना ७ डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनिल परब यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या अनधिकृत बांधकामासंबंधात नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल यांनी परब यांना १९ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलवले, असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.

Kirit Somaiya’s assassination, demand for Hasan Mushrif’s resignation, cancellation of Rs 1,500 crore contract

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण