किरीट सोमय्यांनी साधला अजित पवारांवर निशाणा! म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीत केला घोटाळा

विशेष प्रतिनिधी

मुबंई : महाविकास आघाडीतील प्रत्येक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा जणू विडा उचलल्याप्रमाणे किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील नवीन आरोप केले आहेत.

Kirit Somaiya targets Ajit Pawar!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्याच्या संचालकांच्या घरी म्हणजेच पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. तसेच अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी ही छापेमारी करण्यात आली होती. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता आणखीन धक्कादायक आरोप केले आहेत. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीतील घोटाळा अजित पवार यांनी केला आहे.

या संदर्भात किरीट सोमय्या म्हणतात की, अजित पवारांनी स्वत: अर्थमंत्री असताना या कारखान्याचा लिलाव करण्यास भाग पाडले. आणि स्वतःच या कंपनीला विकत घेतले.  तसेच आपल्या बहिणींच्या नावे अजित पवारांनी बेनामी संपत्ती का उभी केली? असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.


केंद्र सरकारच्या दीड हजार कोटी रुपयांच्या निधीचे कंत्राट हसन मुश्रीम यांनी नातेवाइकांना दिले, किरीट सोमय्या यांचा आरोप


या सर्व प्रकरणानंतर ‘आता बहिणीच्या घरी धाडी टाकल्या’ असे भावनिक वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. तर किरीट सोमय्या इथेच थांबत नाहीत. त्यांनी पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणतात, जर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे त्यांच्या पत्नीच्या नावे 19 बंगले विकत घेऊ शकतात तर उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बहिणीच्या नावे बेनामी संपत्ती  गोळा करु शकतात. तसेच जरंडेश्वर कारखान्याने सर्वात जास्त शेअर्स हे अजित पवारांच्या नावावर असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणादरम्यान शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, केंद्र शासनाच्या तपास यंत्रणेचा भाजपकडून गैरवापर केला जात आहे. कारण फक्त महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांच्या घरी, संपत्तीवर धाडी टाकल्या जात आहेत. मात्र कोणत्याही भाजप नेत्यांच्या घरी अशा धाडी टाकण्यात आल्या नाहीत.

Kirit Somaiya targets Ajit Pawar!

 

महत्त्वाच्या बातम्या