किरीट सोमय्यांचे मुंबईत जंगी स्वागत; ठाकरे – पवार सरकारला म्हणाले ४० चोरांचे मंत्रिमंडळ!!


प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या तोफा डागून कराडहून मुंबईत परतलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी सोमय्या यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे – पवार सरकार, मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. Kirit Somaiya Has Leveled Serious Allegations Of Corruption Against Thackeray – Pawar Government And The BMC

ठाकरे – पवार सरकारचा ४० चोरांचे मंत्रिमंडळ असा उल्लेख करत त्यांनी आता गंभीर लढाईला सुरुवात झाली असून आम्ही आता या महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार, असा संकल्प केला.



ठाकरे – पवार सरकार हे भ्रष्टाचारी असून राज्यातील लोकांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. लोकांच्या या विश्वासाला आम्हाला जागायचे आहे. तेव्हा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे अलीबाब ४० चोर मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई होणार असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारयुक्त बनवला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे बेकायदेशीर १९ बंगले बांधले असून त्या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी मी जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे.

– ७७ कोटी रुपये मातोश्रीतील कोणाकोणाच्या खिशात गेले?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोमय्या यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेवर केले. रेमडेसिवीरची गरज असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने टेंडर काढले. त्यावेळी हाफकिन इन्स्टीट्यूटने रेमडेसिवीर प्रती इंजेक्शन ६६५ रुपये घेतले असताना मुंबई महापालिकेने मात्र एक इंजेक्शन १ हजार ६६५ रुपयांना दिले. मुंबई महापालिकेने ७७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्या. यात ७७ कोटी रुपये कमावले असल्याचा गंभीर आरोप करून हे ७७ कोटी मातोश्रीमध्ये कोणाकोणाच्या खिशात गेले??, असा सवाल सोमय्या यांनी केला.

एका बाजूला एका दिवसात अडीच कोटींचे लसीकरण होत असताना त्याचवेळेला मुंबई महापालिका १ कोटी कोव्हीड लशींचे टेंडर काढले. यात ११ लोकांनी निविदा भरल्या. मात्र या सगळ्या कंपन्या बोगस होत्या हे किरीट सोमय्यांनी सिद्ध करून दाखवले आणि मुंबई महापालिकेला हे टेंडरच रद्द करावे लागले, असे सोमय्या म्हणाले.

– मुलुंड पूर्व पोलिस ठाण्याच्या इन्स्पेक्टरला सोडणार नाही- सोमय्या

काल मला माझ्या मुलुंडमधील घरात पोलिसांनी बेकायदेशीरपणे ६ तास कोंडून ठेवले. ही पोलिसांच्या दमनशाहीची हद्दच होती. कोणत्या कायद्याच्या आधारे मला पोलिसांनी बाहेर पडू दिले नाही? आता आम्ही मुलुंड पूर्व पोलिस ठाण्याच्या इन्स्पेक्टरला सोडणार नाही, अस असा इशारा सोमय्या यांनी दिला.

 

Kirit Somaiya Has Leveled Serious Allegations Of Corruption Against Thackeray – Pawar Government And The BMC

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात