कस्तुरबा रुग्णालयातील एलपीजी गॅस गळती रोखणाऱ्या महापालिका अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा सत्कारमहापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते गौरव


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एलपीजी गॅस गळती रोखण्यासाठी धीरोदत्तपणे सामना करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे मुंबई सुरक्षित असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. Kasturba Hospital LPG gas leak prevention Municipal officers / staff felicitated Honor at the hands of Mayor Kishori Pednekar

कस्तुरबा रुग्णालयात दि. ७ ऑगस्ट रोजी एलपीजी गॅस गळती झाली होती. महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या समयसुचकतेमुळे तसेच सर्व विभागाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे या गळतीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सुरक्षा विभाग, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी तसेच “ई” विभागाचे अधिकारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.



या सर्व विभांगातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात पेडणेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.

याप्रसंगी उप महापौर सुहास वाडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे ) श्री. सुरेश काकाणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

पेडणेकर म्हणाल्या की, गॅस गळती सुरू झाल्यानंतर महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने ज्या समसूचकतेने संदेश देऊन वरिष्ठांना कळविले तसेच गळती रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले. याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे व हा संदेश सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रकारच्या अश्या कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत असून कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. यापुढील काळात अश्या प्रकारच्या घटना घडू नये यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात यावे असे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Kasturba Hospital LPG gas leak prevention Municipal officers / staff felicitated Honor at the hands of Mayor Kishori Pednekar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात