कालीचरण महाराजाना पुणे पोलिसांकडून अटक, रायपूर पोलिसांकडून घेतले ताब्यात


  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. Kalicharan Maharaj arrested by Pune police, taken into custody by Raipur police

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती.

खडक पोलिस ठाण्यात 1 महिन्यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कालीचरण महाराजाला अटक करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या विरोधात धर्मसंसदेमध्ये आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यानंतर कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली. रायपूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केल्यानंतर पोलीस कोठडी घेण्यात आली होती.



पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक नागपुरे, कालीचरण महाराज, नंदकिशोर एकबोटे आणि दिगेंद्रकुमार यांच्यावर भादवी कलम २९५ (अ), २९८,५०५ (२),३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानात पोलीस अंमलदार सोमनाथ ढगे यांनी तक्रार दिली आहे. शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाच्या आनंदोत्सव कार्यक्रमात वादग्रस्त भाषण करण्यात आले होते.

रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजाला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलिसांनी न्यायालयाकडे कालीचरण महाराजाचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांची विनंती मान्य करून कालीचरण महाराजाचा ताबा पुणे पोलिसांकडे दिले आहे. रायपूर पोलीस न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलीस पुण्याकडे रवाना झाले.

Kalicharan Maharaj arrested by Pune police, taken into custody by Raipur police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात