‘जलयुक्त शिवार – २’ सुरू करणार, पहिल्या टप्प्यात राज्यभरातील पाच हजार गावांचा समावेश – देवेंद्र फडणवीस

Fadnvis Jalyuktashivar

… तर आपल्यला पाण्याचा थेंब अन् थेंब साठवावा लागणार आहे. असंही फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

प्रतिनिधी

पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळ सुरू केलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला आता सुरूवात होणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. Jalyukta Shivar 2 will be started five thousand villages across the state will be included in the first phase  Devendra Fadnavis

फडणवीस म्हणाले, ‘’आपल्याला माहीत आहे की ५० टक्के आपला महाराष्ट्र हा आवर्षन प्रवण आहे, कमी पाऊस होतो त्यामुळे जलसंधारणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. मागील काळात आपण जलयुक्त शिवार सारखी योजना चालवली आणि २० हजार गावांमध्ये आपण जलसंधारणाची कामे केली. जवळजवळ ३७ लाख हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आली. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढला. मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांना दोन पिकं घेता आली आणि ती योजना पुन्हा आपण सुरू करत आहोत, जलयुक्त शिवार – २ या टप्प्यामध्ये आपण पहिल्यांदा पाच हजार गावे घेतली आहेत.’’


तब्बल ४२ वर्षांनंतर वाशिममधील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे दार अखेर उघडले


याचबरोबर ‘’यावर्षी यासाठीही देखील ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. की काही हवामान अभ्यास करणाऱ्या संस्था असं भाकीत करत आहेत की हे अलनिनोचं वर्ष असू शकतं. हे जर अलनिनोचं वर्ष असेल तर आपल्याला जलसंधारण करावं लागेल. पाण्याचा थेंब अन् थेंब साठवावा लागेल. वैरण विकास करावा लागेल आणि त्या दृष्टीने हे सगळं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की पाणी फाउंडेशन अतिशय चांगल्याप्रकारे हे सगळं करत आहे. जवळपास ४० हजार शेतकऱ्यांना त्यांनी यामध्ये गुंतवलं आहे.’’ असंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं.

याशिवाय ‘’विषमुक्त शेती हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय हा पाणी फाउंडेशनने घेतला आहे. पाणी फाउंडेशनच्या एकूण या प्रयत्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, तर ज्याप्रकारे ते प्रशिक्षण देत आहेत, म्हणजे प्रत्येक शेतकरी हा केवळ प्रशिक्षण घेतोय असं नाही तर तो प्रशिक्षक होतोय. म्हणूनच मागील काळातही मी मुख्यमंत्री असताना मी पाणी फाउंडेशनला सोबत घेऊन काम केलं आहे आणि आताही त्यांच्यासारख्या जेवढ्या चांगल्या संस्था असतील, त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत.’’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

https://youtu.be/hcQVM4sm57c

Jalyukta Shivar 2 will be started five thousand villages across the state will be included in the first phase  Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात