प्रतिनिधी
मुंबई : भारत देश 2014 नंतर सामान्य नागरिकांसाठी राहण्यासाठी असुरक्षित देश बनवल्याचे शरसंधान काही कथित लिबरल्स आणि बॉलिवूडचे अभिनेते साधत असतात. यामध्ये आमीर खान आणि नसरुद्दीन शहा मध्यंतरी फारच “आघाडीवर” होते. नसरुद्दीन शहा आजही भारत देश मुस्लिमांसाठी असुरक्षित वाटतो. परंतु प्रख्यात उद्योगपती आणि बँकर उदय कोटक यांचे चिरंजीव जय कोटक यांनी आपल्या एका ट्विटमधून आहे आणि फेसबुक पोस्ट द्वारे संबंधितांना सणसणीत चपराक हाणली आहे.Jai Kotak slaps those who call India insecure; How to read it
जय कोटक हे कोटक महिंद्रा बँकेचे सहअध्यक्ष आहेत. ते अमेरिकेतल्या आपल्या कॉलेजमधले रियुनियन साठी नुकतेच गेले होते. तेव्हा त्यांनी अमेरिकेविषयीची काही निरीक्षणे नोंदवली आहेत. ती फक्त अमेरिकेसाठीच नव्हे, तर भारतीयांसाठी आणि संपूर्ण जगासाठी डोळे उघडणारी आहेत.
आपल्या ट्विटमध्ये जय कोटक म्हणतात : हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या पाचव्या रियुनियन मध्ये सहभागी झालो. पण अमेरिका आता घसरणीला लागलेल्या देश वाटला. महागाई वाढणे समजू शकतो. परंतु अमेरिकेतील शहरे आता दिवसेंदिवस घाणेरडी होत चालली आहेत. दररोजच्या बंदुकीच्या गोळीबाराच्या हिंसाचाराच्या बातम्यांनी वर्तमानपत्रे भरली आहेत.
अमेरिकेत गन कल्चरने धुमाकूळ घातला आहे. विमानतळांवर मोठ्या रांगा, विमानांचा विलंब नित्याचे झाले आहे. सर्वसामान्य माणूस आता निराश झालेला दिसतो आहे. त्याउलट भारतात परत येताना एका चांगल्या देशात परत येतोय, अशी भावना वाटतेय. मी जो फोटो शेअर केला आहे, तो बोस्टन विमानतळाचा आहे. मुंबई विमानतळ यापेक्षा अधिक प्रवाशांना हँडल करतो. बोस्टन विमानतळाची अशी दुरवस्था झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App