IT Raids Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या घरावर कारखान्यावर इन्कम टॅक्सचे छापे!!; कोट्यावधींची कर चोरी केल्याचा संशय


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील घरावर आणि त्यांच्या साखर कारखान्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले आहेत. कोट्यावधी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ याच्यावर आहे. IT Raids Mushrif: Income tax raids on Hassan Mushrif’s house and factory !!; Suspected tax evasion of crores

आज सकाळी हसन मुश्रीफ हे मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला पोहोचले आणि तेथून कागलच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याच वेळी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी तिथे पोहोचले होते. हसन मुश्रीफ यांना भेटायला शेकडो कार्यकर्ते आले होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अधिकाऱ्यांबरोबर आलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवले.– छापे अजून सुरू

सध्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ऑफिस सुरू आहेत नाविद मुश्रीफ हे या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांची कर चोरी केल्याचा मावशीला पिता पुत्रांवर आरोप आहे.

– प्राजक्त तनपुरे यांची संपत्ती जप्त

राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री प्राजक्त तनपुरे यांची तेरा कोटीची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे.

IT Raids Mushrif : Income tax raids on Hassan Mushrif’s house and factory !!; Suspected tax evasion of crores

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था