मोबाईल हरवल्यावर प्रतिज्ञापत्र मागणे बेकायदेशिर, पोलीस आयुक्तांनी दिला पोलीसांवर कारवाईचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मोबाईल हरविल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांकडून नोटरीकडून शपथपत्र आणण्यास सांगितले जाते. हे बेकायदेशिर आणि आक्षेपार्ह असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले असून अशी मागणी करणाºया ठाणे अंमलदारावर कारवाईचा इशारा दिला आहे. It is illegal to ask for an affidavit after losing a mobile phone, the Commissioner of Police warned of action against the police

पोलीस आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, मोबाईलसह पासपोर्ट चेकबूक, ड्रायव्हिंग लायसन्स हरविल्यावर नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात. याठिकाणी ठाणे अंमलदाराकडून त्यांना नोटरीकडून शपथपत्र (अ‍ॅफिडेव्हीट) आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप होतो.



त्याचबरोबर आर्थिक नुकसानही होते. हे शपथपत्र दिल्याशिवाय वस्तू किंवा प्रमाणपत्र देण्यास नकार देतात. ही बाबत पूर्णपणे बेकायदेशिर आणि आक्षेपार्ह आहे. वस्तू अगर कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रस्तावित कायद्यामध्ये नाही. तरीही पोलीसांकडून शपथपत्राची मागणी केली जाते व तक्रारदाराची अडवणूक केली जाते.

त्यामुळे एखादी व्यक्ती वस्तू किंवा प्रमाणपत्र घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यावर त्याच्याकडून शपथपत्राची मागणी करू नये. अशी मागणी केल्यास गंभीर दखल घेऊन खातेनिहाय चौकशी करून गंभीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

It is illegal to ask for an affidavit after losing a mobile phone, the Commissioner of Police warned of action against the police

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात