विशेष प्रतिनिधी
पुणे : येरवडा खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गुरूवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी बारा नंतर ही घटना उघडकीस आली. Inmate commits suicide in Yerawada open jail
गणेश जगन्नाथ तांबे (५३) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. २०१० साली विरार येथील खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची झाली होती. २०१९ पासून तो येरवडा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता. बराक क्रमांक दोन येथे त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे इतर कैद्यांनी बघितले. स्वयंपाकाचे काम उरकल्यानंतर त्याने मरण पत्करले.
गणेश तांबे याच्या गळफासानंतर खुल्या कारागृहातील अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबत माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. वैद्यकीय तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तांबे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून अधिक तपास येरवडा पोलीस करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App