विशेष प्रतिनिधी
मुंबई: एकेकाळी लाल गहू मागणारा भारत आज मोदीजींच्या नेतृत्वामुळे साठ सत्तर देशांना करोनाची लस निर्यात करत आहे. हे पाहिल्यावर आपला ऊर भरून येतो अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला आहे.India, once demanding red wheat, is exporting corona vaccine due to Modi’s leadership, Chandrakant Patil praises PM
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन पाटील यांच्या भाषणानं झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अनेक लोक पंतप्रधान मोदींवर टीका करत असतात. पण ते भुंकणाºयांकडे ते लक्ष देत नाहीत. सिंहाच्या दिमाखात चालत असतात. कोविडच्या महासाथीवर मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने मात केली. त्यामुळेच देशाने आता लसीकरणात १०९ कोटींचा टप्पा पार केलाय. महाराष्ट्रातही १० कोटी नागरिकांचं लसीकरण झाले आहे. हे सगळे लसीचे डोसही केंद्र सरकारनेच दिलेहोते.
महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करताना पाटील म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राजकारणाचे गुन्हेगारीकरण केलं आहे. जवळ जवळ सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचं नाव जोडले गेले आहे.
राज्यात सामूहिक बलात्काराच्या दु:खदायक घटना घडत आहेत, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्याचं काही वाटत नाही. इतकं हे सरकार संवेदनाशून्य झालं आहे. याउलट भाजप प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा म्हणून राज्यात चारशे ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची आंदोलनं झाली. एसटी कामगारांच्या संपात भाजपचा सक्रिय सहभाग आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत.
त्रिपुरात जी घटना घडली नाही, तिच्या अफवेवरून मालेगाव, अमरावती, नांदेड येथे दंगली होतात, त्यासाठी १५ ते २० हजार लोक रस्त्यावर येतात व पोलिसांवर हल्ला करतात याचीही आघाडीला चिंता नाही. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली तरीही भाजपवर आरोप करतात. अंमलीपदार्थांचं समर्थन केले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी स्थिती झाली असताना आपल्याला संघर्ष चालू ठेवायचा आहे, असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App