धी
मुंबई : प्रवीण राऊत हे नावाला आहेत. सगळे व्यवहार संजय राऊत यांचेच आहेत. पत्राचाळ घोटाळ्यातल्या पैशातून अलिबागची जमीन, दादरचा फ्लॅट ही सगळी खरेदी झाल्याचा युक्तिवाद सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कोर्टात केला आहे. संजय राऊत यांचा पत्राचा घोटाळ्यात सहभाग असल्याचे प्राथमिक निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदविले आहे. In the name of Praveen Raut, all transactions of Sanjay Raut
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांना विशेष ईडी न्यायालयाने 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचे आढळून असल्याचे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले आहे. वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीची, तर वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांची बाजू मांडली.
पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी काल सकाळी ईडीने संजय राऊत यांना दुपारी 2 वाजता संजय राऊत यांना 2.15 मिनिटांनी त्यांना कोर्टाच्या रूम नंबर 16 विशेष ईडी न्यायालयात हजर केले.
ईडीच्या वकिलांचे राऊतांवर गंभीर आरोप
सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. प्रवीण राऊत पत्राचाळीची डेव्हलपमेंट पाहत होता. त्याला HDIL कडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातले 1 कोटी 6 लाख 44 हजार वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांना परत प्रविण राऊतने 37 कोटी दिले, नंतर त्यातून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतला, असा दावा ईडीच्या वकिलांनी केला.
पत्राचाळ घोटाळ्याचा फायदा संजय राऊतांना
राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. अलिबाग येथे विकत घेतलेली जमीन याच पैशातून खरेदी करण्यात आली. प्रवीण राऊत फक्त नावाला होता, तो संजय राऊत यांच्या वतीने सर्व व्यवहार करत होता, मग पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे असो किंवा दादरमधले घर आणि अलिबागची जमीन, हे सगळे संजय राऊत यांच्या सांगण्यावरून करण्यात आलं, असा आरोप ईडीने कोर्टामध्ये केला आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App