#बायकॉट लालसिंग चढ्ढा ट्रेंड नंतर बॉलिवूड स्टार आमिर खान काकुळतीला; फॉरेस्ट गम्पची तुलना अडचणीची!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून #बायकॉट लालसिंग चढ्ढा ट्रेंड सुरू झाल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान काकुळतीला आला आहे. त्याने एका मुलाखतीत 11 ऑगस्टला चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे. After Boycott Lal Singh Chadha Trend Bollywood Star Aamir Khan

भारत वाटला होता असुरक्षित

आमिर खानने घेतलेल्या वेगवेगळ्या सामाजिक आणि विशेषतः राजकीय भूमिकांमुळे सध्या त्याच्या विरोधात हिंदुस्थानात प्रचंड रोष आहे. तरुणाई त्याच्या अनेक भूमिकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार 2014 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर आमिर खानची पत्नी किरण राव हिला अचानक देशात “असुरक्षित” वाटू लागले होते. भारतात असहिष्णुता वाढते आहे असे सांगून आमिर खानने देखील तिचे समर्थन केले होते.

तुर्कस्तान मध्ये भारत विरोधी भूमिका

त्यानंतर आमिर खानने तुर्कस्तान मध्ये जाऊन भारताविरुद्ध काही भूमिका मांडली होती. काश्मीर प्रश्नावर तुर्कस्तानने नेहमी पाकिस्तानची बाजू घेतली आहे. तरी देखील आमिर खानने तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीची भेट घेतली आणि त्यांचे समर्थन केले होते. त्याचबरोबर देशातल्या असुरक्षित वातावरणाच्या मुद्द्यावरून देखील त्याने अनेकदा टीका टिप्पण्या केल्या होत्या.

लालसिंग चढ्ढा अडचणीत

या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या सिनेमांवर बहिष्कार घालण्यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार मोहीम चालली. आमिर खानच्या अभिनयाविषयी देखील अनेकांनी शंका व्यक्त केली. “मिस्टर परफेक्शनिस्ट” अशी प्रतिमा असणाऱ्या आमिर खानला बॉलिवूडमध्ये कोणी चॅलेंज केले नव्हते. परंतु सोशल मीडियात मात्र त्याच्याविरुद्ध जोरदार ट्रेंड उसळल्यानंतर आता त्याचा लालसिंग चढ्ढा सिनेमा अडचणीत आला आहे.

फॉरेस्ट गम्पशी तुलना

ज्या फॉरेस्ट गम्प या सिनेमाचा लालसिंग चढ्ढा रिमेक आहे, त्या सिनेमाशी देखील अनेकांनी तुलना केली आहे. फॉरेस्ट गम्प हा ऑस्कर विजेता सिनेमा आहे. त्या सिनेमाचा दर्जा उच्च आहे. निर्मिती मूल्य उत्तम आहे. त्या तुलनेत लालसिंग चढ्ढा डावा ठरतो. टॉम हँक्स याच्या तुलनेत आमिर खानचा अभिनय देखील डावा ठरतो, असे आर्ग्युमेंट अनेकांनी सोशल मीडियावर केले आहे.

लालसिंग चढ्ढा फ्लॉप होण्याचा धोका

लालसिंग चढ्ढा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्यावर बहिष्कार घालण्याची भाषा सुरू झाल्यामुळे सिनेमा फ्लॉप होण्याचा धोका आमिर खानला वाटतो आहे. त्यामुळेच त्याने एका मुलाखतीतून प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्याचे आवाहन केले आहे. लोकांना माझ्या देशभक्ती विषयी शंका आहे. परंतु तशी वस्तुस्थिती नाही. कृपया लोकांनी माझ्याबद्दलचा मनातला गैरसमज काढून टाकावा, असे त्याने वक्तव्य केले आहे. आता आमिर खानच्या या वक्तव्यानंतर लोकांवर नेमका काय परिणाम होतो आणि 11 ऑगस्ट 2022 लालसिंग चढ्ढा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो??, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

After Boycott Lal Singh Chadha Trend Bollywood Star Aamir Khan

महत्वाच्या बातम्या