विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न!!; संजय राऊत यांच्या अटकेवर अविनाश भोसलेंचे जावई बोलले!!


प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते आहे, असे शरसंधान महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी साधले आहे. संजय राऊत यांच्या अटकेवर विश्वजीत कदम यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Avinash Bhosle’s son-in-law spoke on Sanjay Raut’s arrest

हेच ते विश्वजीत कदम आहेत, जे अविनाश भोसले यांचे जावई आहेत. शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची जवळीक असलेले अनिल भोसले सध्या सीबीआयच्या अटकेत आहेत. परवाच पुण्यातल्या त्यांच्या बाणेरच्या निवासस्थानातून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केले आहे. सुमारे 35000 कोटींच्या डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यात अविनाश भोसले आरोपी आहेत. त्यांची पुण्यातली मालमत्ता सीबीआयने जप्त केली आहे. शिवाय याच घोटाळ्यातून तब्बल 1000 कोटी रुपयांची हेरिटेज प्रॉपर्टी अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये खरेदी केल्याची बातमी आली आहे. सीबीआयच्या आरोप पत्रामध्ये लंडनच्या प्रॉपर्टी खरेदीचा उल्लेख आहे. याच अविनाश भोसले यांचे विश्वजीत कदम हे जावई आहेत.


डीएचएफएल घोटाळा : अविनाश भोसलेंचे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त!!


 

अविनाश भोसलेंबद्दल चकार शब्द नाही

विश्वजीत कदम यांनी संजय राऊत यांच्या अटके संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड केस मध्ये ईडी चौकशी सुरू आहे. त्यांचीही नावे विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रियेत घेतली आहेत. सोनिया गांधी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. देशातल्या लोकशाही व्यवस्थेला हे अतिशय घातक आहे, असे शरसंधान विश्वजीत कदम यांनी साधले आहे. मात्र, अविनाश भोसले यांच्या सीबीआय अटकेवर आणि त्यांच्या संपत्ती जप्तीबद्दल आणि त्यांचे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केल्याबद्दल विश्वजीत कदम यांनी चकार शब्द उच्चारलेला दिसत नाही.

Avinash Bhosle’s son-in-law spoke on Sanjay Raut’s arrest

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात