डीएचएफएल घोटाळा : अविनाश भोसलेंचे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : डीएचएफएल आणि येस बँक 34,165 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेले उद्योजक आणि शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांचे निकटवर्ती असलेले अविनाश भोसले यांचे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सीबीआयने जप्त केले आहे. अविनाश भोसले यांची खूप मोठी मालमत्ता आधीच सीबीआय आणि ईडीने जप्त केली आहे. त्यात आता हाय प्रोफाईल ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरची भर पडली आहे. सीबीआयने शनिवारी रात्री उशिरापर्यंत अविनाश भोसले यांच्या पुण्यातील मालमत्तांवर छापायची कारवाई केली यामध्ये त्यांच्या पुण्यातल्याच परिसरातून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केले. Avinash Bhosle’s AgustaWestland helicopter seized by CBI

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यामध्ये अनेक काँग्रेस नेत्यांवर संशय आहे. त्यामध्ये सोनिया गांधी यांचा देखील समावेश आहे. त्यापैकी एक हेलिकॉप्टर अविनाश भोसले यांच्याकडे असणे आणि ते सीबीआयने जप्त करणे याला डीएचएफएल घोटाळा तसेच ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा या दृष्टीने फार मोठे महत्त्व आहे.डी एच एफ एल घोटाळ्यात आधीच वाधवान बंधू यांच्याविरुद्ध सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. दोघेही वाधवान बंधू सीबीआयचे अटकेत आहेत. त्यात आता अविनाश भोसले यांचे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केल्यानंतर या घोटाळ्यासंदर्भातील कारवाई अधिक खोलवर गेली आहे.

 घोटाळ्याच्या पैशातून अविनाश भोसलेंची लंडनमध्ये 1000 कोटींची हेरिटेज बिल्डिंग खरेदी; सीबीआयचे आरोपपत्र

अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा उल्लेख सीबाआयने आरोपपत्रात केला आहे. त्यामुळे अविनाश भोसले यांची लंडनमधील मालमत्ताही सीबीआयच्या स्कॅनरखाली आली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसले विरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून ही माहिती समोर आली आहे.

 लंडनमध्ये हेरिटेज इमारत खरेदी

लंडनमधील “फाईस ट्रॅक” ही अलिशान हेरिटेज इमारत 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या इमारतीत 200 खोल्यांचे शानदार हेरिटेज हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बकिंगहॅम पॅलेसजवळ ही हेरिटेज इमारत आहे. अविनाश भोसले यांनी ती खरेदी केल्यानंतर भारतीय उद्योजकाच्या या साहसाची त्यावेळी मोठी चर्चाही झाली होती.

इमारत खरेदी 1000 कोटींची

या हेरिटेज इमारतीची खरेदी आणि तिचे हाॅटेलमध्ये रूपांतर यासाठी लागलेल्या 1000 कोटी रुपयांपैकी 700 कोटी रुपये अविनाश भोसले यांनी येस बँकेतून कर्ज स्वरुपात घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहे. या कर्जात अनियमितता आहे. केवळ कन्सलटन्सी फ्री म्हणून 70 कोटी रुपये दिले गेले, रेडीयस ग्रूप आणि डीएचएफएलकडून यांच्याकडून एकूण 700 कोटी रुपये जमवले होते त्यात स्वतः 300 कोटींची रक्कम भरत व्यवहार इमारत खरेदीसाठी केला होता.

 सर्व व्यवहार सीबीआयच्या रडारवर

हा व्यवहार सीबीआयच्या रडारवर आहे. या व्यवहारांचा तपशील काय होता याचाच तपास सीबीआय करीत आहेत, सध्या अविनाश भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची परत सीबीआय कोठडी घेतली जाऊ शकते आणि परत चौकशी केली जाऊ शकते.

 26 मे रोजी भोसलेंना अटक

अविनाश भोसले यांना डीएचएफएल आणि येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

 पुण्यातील मालमत्ता जप्त

सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंवर ही कारवाई केली. भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणांची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे – मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Avinash Bhosle’s AgustaWestland helicopter seized by CBI

महत्वाच्या बातम्या