सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांच्या एसटीवर अज्ञातांनी केली दगडफेक


  • एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक होण्याच्या घटना समोर येत आहेत. In Sindhudurg, unknown persons hurled stones at students’ ST

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : एसटी कर्मचारी मागील दोन महिन्यांपासून संपावर आहेत.दरम्यान एसटी कर्मचारी राज्य शासनात विलिनीकरण कऱण्याच्या मागणीवर ठाम आहेत.तर काही कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत.दरम्यान एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना सिंधुदुर्गात घडली आहे.सिंधुदुर्गातील कणकवली येथून कळसुलीकडे निघालेल्या एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. अज्ञातांनी ही दगडफेक केली आहे.सकाळी 8 वाजून 15 मिनिटांच्या आसपास ही घटना घडली आहे. बसमधून 30 विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत चालक कुमार तांबट यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

In Sindhudurg, unknown persons hurled stones at students’ ST

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण