विशेष प्रतिनिधी
पुणे : मोशी येथील देहू आळंदी रस्त्यावर असणा-या कंपन्यांच्या स्क्रॅपला गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास मोठी लागली. स्क्रॅपमालात आॅईल आणि प्लास्टिकचे कॅन असल्याने आगिने रौद्ररुप धारण केले. आगिचे लोळ दुरपर्यंत दिसत होते. घटनेची माहिती मिळताच पिंपरीचिंचवड महापालिका, पुणे महापालिका तसेच देहू कॅन्टोन्टमेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या २५ ते ३० गाडड्या घटनास्थळी पोहचल्या. रात्री ३ च्या सुमारास आगिवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. सध्या कुलींगचे काम सुरु असून आगिचे कारण समजू शकले नाही अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिका-यांनी दिली.
मोशी येथील देऊ आळंदी रस्त्यावरील एका कंपनीत मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे स्क्रॅपमाल टाकला जातो. या स्क्रॅपमध्ये आॅईलचे बॅरल आणि मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे साहित्य होते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याला अचाणक आग लागली. अग्निशामक दलाला रात्री पावणे नऊच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या २५ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. केमिकल बॅरल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान कडून शथीर्चे प्रयत्न सुरू होते. कंपनीत आॅइल असल्याचेही सांगण्यात येत आहे. आग येवढी भिषण होती की यात सर्व साहित्य भस्मसात झाले. रात्री ३च्या सुमारास आगिवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, आग विझवल्यावर कुलींगचे काम सुरु करण्यात आले आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App