लसीपोटी वाचणारे 7 हजार कोटी रुपये तातडीने गरिबांना द्या; गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी


वृत्तसंस्था

पुणे : केंद्र सरकारने जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याचे स्वागत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केले. तसेच लसीकरणा पोटी राज्य सरकारच्या वाचणाऱ्या 7 हजार कोटी रुपयांच्या निधीतून गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीत रोजगारास मुकलेल्या सर्वांसाठी तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही केली. Immediately give Rs 7,000 crore to the poor: Girish Bapat’s demand to Thackeray government

देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे त्यांनी जाहीर आभार मानले आहेत. या निर्णयामुळे राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे, असे बापट म्हणाले.केंद्र सरकारने राज्यांना लस खरेदीची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्राकरिता एकरकमी धनादेश देऊन १२ कोटी लस डोस विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. आता लस पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने या धनादेशाचा वाचलेला सुमारे सात हजार कोटींचा निधी राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता तातडीने वितरित करावा व गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा द्यावा, असे बापट म्हणाले.

ते म्हणाले, ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची दमडीदेखील अजूनही कोणाच्याच खात्यात जमा झालेली नाही. जनतेमध्ये तीव्र संताप पसरला असून त्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

Immediately give Rs 7,000 crore to the poor: Girish Bapat’s demand to Thackeray government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण