टीईटी गैरव्यवहार प्रकरणी सुशील खाेडवेकरला जामीन मंजूर


शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेला आयएएस अधिकारी व शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन सचिव सुशील खाेडवेकर यांस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.


विशेष प्रतिनिधी 

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेला आयएएस अधिकारी व शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन सचिव सुशील खाेडवेकर यांस न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पुणे सायबर गुन्हे शाखेने टीईटी प्रकरणात न्यायालयात दाेषाराेपपत्र नुकतेच दाखल केले असून त्यानंतर तपास पूर्ण झाल्याचा निष्कर्ष काढत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के.पत्रावळे यांनी सदर आदेश दिला आहे. IAS Sushil khodvekar granted bail by Pune session court in TET exam fraud case

खाेडवेकरयांच्याकडून ॲड.एस.के.जैन, ॲड. अमाेल डांगे, ॲड.अमेय गाेऱ्हे, ॲड. तन्मय गिरे यांनी बाजू मांडली. सुशील खाेडवेकर यास २९ जानेवारी २०२२ राेजी पुणे पाेलीसांनी मुंबई येथून अटक केली. त्याचे नाव एफआयआर मध्ये नाही. माेबाईल व पेनड्राईव्ह शिवाय त्याच्याकडून इतर काेणती गाेष्ट जप्त करण्यात आलेली नाही. १९७ नुसार सरकारी नाेकर असून त्यास अटक करताना सरकारची परवानगी घेतलेली नाही. टीईटी परीक्षा दाेषाराेपपत्रा साेबत मुळ उत्तरपत्रिका सादर करण्यात आलेला नाही. प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या खाेडवेकर यात सहभागी नव्हते असा युक्तिवाद ॲड.डांगे यांनी केला आहे.खाेडवेकर याने त्याच्या घराचा खरा व सध्याचा पत्ता, ईमेल, आधारकार्ड याबाबतची माहिती पाेलीसांना द्यावी. काेणत्याही साक्षीदारावर दबाव टाकू नये तसेच पुराव्याशी छेडछाड करु नये, तपास अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय देश साेडून जाऊ नये, सुनावणीस नियमितपणे हजर रहावे अशा अटी न्यायालयाने त्याच्यावर घातलेल्या आहे.

सुखदेव ढेरे, मनोज डोंगरे यांना ही जामीन

राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव ढेरे यांनी टीईटी 2017 च्या परीक्षेत गैरव्यवहार केल्याची बाब पुणे पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे .सुखदेव ढेरे याच्या घर झडतीत दाेन लाख ९० हजार रुपये पोलिसांना मिळून आले होते. न्यायालयाने याप्रकरणात त्यांना ही सशर्त जामीन मंजूर केला आहे.तर चालक म्हणून काम करत असलेला मनोज डोंगरे हा राज्य शिक्षण परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे व तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता.

याप्रकरणात त्याला परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक डॉ प्रीतीश देशमुख याचाकडून तीन लाख पंचवीस हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यालाही न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणातील 15 जणांविरोधात सायबर पोलिसांनी न्यायालयात 3 हजार 955 पानी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात सादर केलेले आहे.

 IAS Sushil khodvekar granted bail by Pune session court in TET exam fraud case

बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था