विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्राप्तिकर खात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर पुष्पदंतेश्वर व अन्य साखर कारखान्यांवर छापे घालून कायदेशीर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. अजितदादांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर हे छापे आहेत. त्यावर अजितदादांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. I am a man of financial discipline; Raids on properties belonging to my sisters are political revenge; Ajit Pawar’s angry reaction
पस्तीस – चाळीस वर्षांपूर्वी लग्न झालेल्या माझ्या पुणे आणि कोल्हापूर मधल्या तीन बहिणींच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई होत आहे. मी हे मला आत्ता अनाकलनीय आहे. ही राजकीय सूडबुद्धीतून केलेली कारवाई आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. मी राज्याचा अर्थमंत्री आहे. कोणते कर चुकवायचे नाहीत, कशा पद्धतीने कर भरायचे याची मला पूर्ण माहिती आहे. माझ्याशी संबंधित कंपनी असलेल्या मालमत्तांवर छापे टाकले त्याच्या बद्दल मला काही म्हणायचे नाही. कारण मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे. प्राप्तिकर विभागाला कोणती माहिती हवी असेल तर ती त्यांनी घ्यावी. परंतु, राजकीय सूडबुद्धीने अशी कारवाई होते याचे वाईट वाटते, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
प्राप्तिकर खात्याशी संबंधित तसेच सक्तवसुली संचालनालय इडीशी संबंधित कोणत्याही कारवाईला राष्ट्रवादीचे नेते राजकीय सूडबुद्धीने कारवाई असेच संबोधताना दिसतात. काल तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावरची कारवाई देखील राजकीय स्वरूपाचीच असल्याचा आरोप केला होता. आज अजित पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांची संबंधित विविध साखर कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याची कायदेशीर कारवाई सुरू असताना अजित पवारांची प्रतिक्रिया ही अशाच स्वरूपाची म्हणजे राजकीय सुडबुद्धीने केलेली कारवाई अशीच आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App