
प्रतिनिधी
पुणे : एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला कोरोनाची धमकी देताहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नेते मुख्यमंत्र्यांचे सल्ले धुडकावून दणक्यात कार्यक्रम घेऊन जनतेची गर्दी जमवत आहेत.Huge crowd in sharad pawar and dilip walse patil’s political program in junnar – ambegaon
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच जुन्नर-आंबेगाव दौऱ्यावर होते. आज पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आणि लोकांनीही तुफान गर्दी केली होती.
मात्र उपस्थितांच्या तुफान गर्दीवर पवार आणि वळसे पाटलांनी ओझरतं बोलताना एका वाक्यात विषय संपवून टाकला. गर्दीवर दोन्ही नेत्यांनी अधिक बोलणे टाळले.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रशासन सर्वसामान्यांना गर्दी करु नका, निर्बंध पाळा असे आवाहन करत असताना पवार – वळसेंच्या राजकीय कार्यक्रमांना मात्र तुफान गर्दी झाली. याचविषयीचा उल्लेख आपल्या भाषणात पवार आणि वळसे पाटील यांनी केला. मात्र तो ही एक-दोन वाक्यात……..! कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे गर्दी टाळायला हवी, लोकांना समोरासमोर भेटणे टाळायला हवे, असे पवार म्हणाले.
तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर,आंबेगाव, जुन्नरमध्ये अद्याप कोरोना बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे, असं म्हणत समोर जमलेल्या गर्दीचा उल्लेख टाळत वळसे पाटलांनी उपस्थितांचे कान टोचण्याचे प्रयत्न केले.
सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार ह्या भागात आले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर कोरोनाची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे जाहीर कार्यक्रम घेता आले नाहीत. आता हळूहळू आपण त्यातून बाहेर येतोय… पण पुणे जिल्ह्यात अद्याप शिरूर,आंबेगाव,जुन्नर मध्ये कोरोना बाबतीत जास्त काळजी घेतली पाहिजे आहेत, असं म्हणत वळसेंनी समोर जमलेल्या गर्दीचा उल्लेख टाळला.
आज राज्यात अडचणीची परिस्थिती आहे. त्यात वादळ, कोरोना यांसारखी आपत्ती आली. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री कारभार पुढे घेऊन जाण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत, असंही वळसे पाटील म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लोकांना भेटणं टाळायला हवं, असे सल्ले आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेत. पण काळे यांचा संकल्प होता. म्हणून आम्ही आलो. व्यासपीठ आणि समोरची गर्दीत अंतर ठेवून आम्ही कार्यक्रम करणार असे ते म्हटले होते म्हणून मी आलो ,असे म्हणत पवारांनीही गर्दीवर अधिक बोलणे टाळले.
Huge crowd in sharad pawar and dilip walse patil’s political program in junnar – ambegaon
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : कोकण प्रवाशांना नको कोरोना चाचणीची सक्ती परप्रांतीयांना एन्ट्री ; कोकणवासीयांची पिळवणूक ?
- दहीहंडी, गणेशोत्सवातच कोरोना पसरतो का?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
- Coal Scam : सीएम ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींना ईडीचे समन्स, सोमवारी राहणार हजर, पत्नी रुजिरा बॅनर्जींनी टाळली चौकशी
- पालघरच्या कापड कारखान्यात स्फोट, बॉयलर स्फोटामुळे एका कामगाराचा मृत्यू; चार जखमी