ठाकरे – पवार सरकारच्या गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील; शरद पवारांची “सेफ गेम” की अजितदादांना “चेकमेट”??


विशेष प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्रातल्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची राजकीय विकेट वाचविण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपयश आल्यानंतर गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटलांचे नाव पुढे करून शरद पवारांनी “सेफ गेम” खेळल्याची चर्चा रंगविली जात आहे. पण त्याचवेळी राष्ट्रवादीच्या एका गोटात हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना तर “चेकमेट” नाही ना, अशीही चर्चा आहे. dilip valse patil home minister; is it safe game of sharad pawar or checkmate for ajit pawar?

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे मंजूरीसाठी पाठविला आहे. त्याचवेळी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात दिलीप वळसे पाटलांकडे गृह मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्याची सूचना केली आहे. वळसे पाटलांकडच्या सध्याच्या कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्याचीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.दिलीप वळसेंवर माध्यमांची स्तुतिसुमने

तत्पूर्वी, शरद पवार हे “सेफ गेम” म्हणून दिलीप वळसे पाटील यांचे गृहमंत्री म्हणून पुढे करण्याची जोरदार चर्चा मराठी माध्यमांनी रंगविली होतीच. दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती माध्यमांनी दिली होती..

वळसे – अजित पवार सुप्त संघर्षाचे काय…

यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. राष्ट्रवादीसाठी ते कायमच संकटमोचक ठरले. ते दिलीप वळसे पाटील हेच सध्या गृहमंत्रिपदासाठी योग्य पर्याय ठरू शकतील, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत निर्माण झाल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले होते. सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारबरोबरच राष्ट्रवादीची मलीन झालेली प्रतिमा वाचवण्यासाठी शरद पवार यांच्याकडून वळसेंचे नाव पुढे येतेय, असे मराठी माध्यमांचे म्हणणे होते.

पण त्याच वेळी अजित पवारांशी झालेल्या सत्तास्पर्धेतून वळसे पाटलांना उपमुख्यमंत्रीपदाऐवजी विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले होते, याकडे मराठी माध्यमांनी बातम्या देताना सोयिस्कर दुर्लक्ष केले होते.

आताही दिलीप वळसे पाटलांच्या गृहमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ही शरद पवारांची “सेफ गेम” आहे, की अजितदादांसाठी “चेकमेट” अशी चर्चा राष्ट्रवादीच्या एका गोटात रंगली आहे. याला जुनी राजकीय पार्श्वभूमी आहे. दिलीप वळसे हे पुणे जिल्ह्यातल्या मंचरचे आहेत. आंबेगाव तालुक्यातून आमदार आहेत. शरद पवारांचे ते काही काळ पीए होते. पवार त्यांच्यावर विश्वास टाकून अनेक कामे करवून घेत असत.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर दिलीप वळसे पाटलांचे राजकीय महत्त्व बरेच वाढल्यानंतर पुणे जिल्ह्यातूनच आपल्या नेतृत्वाला आव्हान मिळण्याची धास्ती अजित पवारांना वाटायला लागली होती. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याआधी दिलीप वळसे पाटलांच्या उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा रंगायला लागली होती.

अजितदादांना त्यांच्याही आधी उपमुख्यमंत्रीपदासाठी बरीच वर्षे वाट देखील पाहावी लागली होती. आर. आर. पाटलांपासून छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटलांपर्यंत राष्ट्रवादीतले अनेक नेते उपमुख्यमंत्री होऊन गेले तरी अजितदादांचा नंबर उपमुख्यमंत्रीपदासाठी लागत नव्हता. आणि २००९ मध्ये दिलीप वळसे पाटलांच्या उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे अजितदादा चिडल्याच्या बातम्या त्यावेळच्या पुण्याच्या वर्तमानपत्रांमध्ये मोठमोठ्या मथळ्यांनी झळकल्या होत्या.

अखेर अजितदादांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या आग्रहावरून दिलीप वळसे पाटलांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले. थोडक्यात त्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला करण्यात आले होते. त्यानंतर बरीच वर्षे दिलीप वळसे पाटील हे low key पोझिशनला राहिले.

आणि आज अनिल देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांना गृहमंत्रीपदाची संधी दिली आहे. पण यात राष्ट्रवादीतल्याच अनेकांना हा अजित पवारांनाच चेकमेट वाटतोय.

dilip valse patil home minister; is it safe game of sharad pawar or checkmate for ajit pawar?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती