WATCH :कोकण प्रवाशांना नको कोरोना चाचणीची सक्ती परप्रांतीयांना एन्ट्री ; कोकणवासीयांची पिळवणूक ?


विशेष प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांची कोरोना टेस्ट रद्द करा ,परप्रांतीयांचे लोंढे राज्यात येतात, मग कोकणावासीयांनाचा का टार्गेट केले जाते? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी केला.Konkan passengers do not want Corona test forced

कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट अस नातं आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित ठाणे जिल्ह्यातील लाखो चाकरमानी सहकुटुंब कोकणाकडे रवाना होतात. मात्र यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट बंधनकारक केली असून आयत्या वेळी ही टेस्ट करायला लावणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे मत कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरातील कोकणी बांधवांनी केली आहे



दोन महिन्यापूर्वी ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली त्याला ८४ दिवसानंतर दुसरा डोस मिळणार आहे. त्यांनी कोकणात जायचे कसे ? एकीकडे केंद्र शासन व राज्य सरकार कोकणवासियांची गणपतीला ये-जा करण्यासाठी बस व रेल्वेची सुविधा देत आहे

तर दुसरीकडे अशाप्रकारे नियम लावून त्यांना प्रवास करू देत नाही, असे सांगत कोरोना टेस्ट सक्तीत शिथिता द्यावी, अशी मागणी करत आहेत. येत्या निवडणुकीत आपला रोष व्यक्त करण्याचा मानस केला आहे.

कल्याण , डोंबिवली ,दिवा, ठाणे व नजीकच्या परिसरात मोठ्या संख्येने कोकणवासीय राहतात. त्यामुळे येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम मतदानावर होणार का? ते देखील पाहावं लागेल.

  • कोकण प्रवाशांना नको कोरोना चाचणीची सक्ती
  • परप्रांतीयांचे लोंढे राज्यात येतात ते कसे चालते
  • कोरोना चाचणीमध्ये शिथिलता देण्याची मागणी
  • निवडणुकीत आपला रोष व्यक्त करण्याचा मानस
  •  महापालिका निवडणुकीत हिसका बसणार का ?

Konkan passengers do not want Corona test forced

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात