चार लाखांच्या बदल्यात ११ लाख देऊनही अधिक पैसे मागणाऱ्यावर गुन्हा दाखल


भाचीच्या लग्नासाठी तसेचच हाॅटेलच्या दुरुस्तीकरिता एका व्यवसायिकाने पाच टक्के दराने तीन लाख ९० हजार रुपये ओळखीच्या इसमाकडून उधार घेतले हाेते. त्याबदल्यात त्यास ११ लाख रुपयांची परतफेड करुनही आणखी दीड लाख रुपये थकीत व्याजाचे मागून त्रास देणाऱ्या व्यक्तीवर पाेलीसांनी महाराष्ट्र सायकारी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. Hotel businessman take loan of four lakhs rupees for his personal work and return amount of 11lakhs rupees after that’s more money demanded by lender


विशेष प्रतिनिधी

पुणे : भाचीच्या लग्नासाठी तसेचच हाॅटेलच्या दुरुस्तीकरिता एका व्यवसायिकाने पाच टक्के दराने तीन लाख ९० हजार रुपये ओळखीच्या इसमाकडून उधार घेतले हाेते. त्याबदल्यात त्यास ११ लाख रुपयांची परतफेड करुनही आणखी दीड लाख रुपये थकीत व्याजाचे मागून त्रास देणाऱ्या व्यक्तीवर पाेलीसांनी महाराष्ट्र सायकारी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.



अमरजित सिंग रंधवा (रा.कळस,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी रविराज तिम्यया शेट्टी (४९,रा.धानाेरी,पुणे) यांनी विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेट्टी यांनी एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत अमरजित रंधवा यांच्याकडून घर खरेदी करण्याकरिता, भाचीच्या लग्नाकरिता तसेच हाॅटेलची दुरुस्ती करण्यासाठी वेळाेवेळी एकूण तीन लाख ९० हजार रुपये पाच टक्के दराने कर्ज घेतले हाेते. त्यानुसार शेट्टी हे रंधवा यांना दर महिना १९ हजार ५०० रुपये प्रमाणे व्याजाचे डिसेंबर २०२१ पर्यंत सुमारे ११ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर शेट्टी यांच्याकडे पैसे नसल्याने ते आराेपीस व्याजाचे पैसे देवु शकले नाहीत. त्यामुळे त्याने एक ते दाेन वेळा तक्रारदार याचे राहते घरी येवून तसेच अनेकवेळा त्यांचे हाॅटेलवर येवून व वारंवार शेट्टी यांना फाेन करुन थकीत दीड लाख रुपये व्याजाचे पैसे मागणी करत पैशांचा सतत तगादा लावून त्रास दिला. याप्रकरणी पाेलीस अधिक तपास करत आहे.

Hotel businessman take loan of four lakhs rupees for his personal work and return amount of 11lakhs rupees after that’s more money demanded by lender

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात