गृहमंत्री वळसे पाटील ‘ बिचारे ‘ – चंद्रकांत पाटील


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बाबत काेणता निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ते सर्व अधिकार मातोश्री जवळ आहे असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बाबत काेणता निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ते सर्व अधिकार मातोश्री जवळ आहे.भोंग्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत केवळ चहा आणि बिस्कीट खाण्यास बैठकीत ते जाणार असे दिसून आल्याने आम्ही बैठकीस गेलाे नाही. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे ‘बिचारे’ आहे असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना लगावला.Home minister Dilip Walse patil not power to take decision of Mumbai says BJP state president chandrkant patil

पाटील म्हणाले, शिवसेनेच्या महान नेत्यांना न्यायालयाचे सर्व निर्णयावर बाेलण्याचा अधिकार आहे. परंतु आम्हाला अशाप्रकारे बाेलण्याचा अधिकार नाही कारण आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो. सर्वपक्षीय बैठकीला जाण्यासारखी परिस्थीती महाविकास आघाडीने ठेवली नव्हती. मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित आसणार नाही. ज्यांनी राज्याचे ५० वर्ष राजकारण केले,



ज्यांच्या शब्दाला महत्व ते बैठकीस उपस्थित राहणार नाही त्यामुळे अशी बैठक निरुपयोगी होती. खाेटे बाेल पण रेेटून बाेल ही मविंआची कार्यपध्दत आहे. तसेच लाथ मारायची व माफी मागयाची अशी मविआची वृत्ती आहे. तीन दिवस विराेधकांच्या वाहनावर दगड मारायचे व बैठकीला या सांगयचे हे बराेबर नाही. मुंबईत पाेलखाेल यात्रा आम्ही सुरुच ठेवणार असून त्याचा समाराेप कार्यक्रम आम्ही विक्रमी पध्दतीने घेऊ.

भाजपची अधिकृतरित्या काेणतीही राष्ट्रपती राजवटीची मागणी नाही. भाजप अशाप्रकारे राज्यपालांकडे पत्र घेऊन गेलेलाे नाही. अशासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे की नाही याबाबतचा निर्णय राज्यपाल यांनी घेणे आवश्यक आहे. सरकार पाेलीसांना हाताशी घेऊन दडपशाही करत असून हे याेग्य नाही. काेल्हापूरची पाेटनिवडणुक महाविकास आघाडी हरलेली आहे कारण तीन पक्ष एकत्रितरित्या लढले व त्यांना ९६ हजार मते मिळाली आहे. भाजप एकटे लढून मागील वेळेपेक्षा अधिक मते मिळवणारा पक्ष ठरला आहे.

Home minister Dilip Walse patil not power to take decision of Mumbai says BJP state president chandrkant patil

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात