राष्ट्रपती राजवटी संर्दभात आम्ही मागणी केलेली नाही – चंद्रकांत पाटील


राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली तरी आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही परंतु महाविकास आघाडीच्या पाेटात भिती वाटत आहे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.We don’t demanded president rules in Maharashtra says BJP state president chandrakant patil


विशेष प्रतिनिधी 

पुणे -राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली तरी आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही परंतु महाविकास आघाडीच्या पाेटात भिती वाटत आहे. राज्यपाल, पंतप्रधान यांना राष्ट्रपती राजवटीसाठी आम्ही काेणताही पत्रव्यवहार केलेला नाही. सामान्य नागरिक ही राष्ट्रपती राजवटची मागणी करु शकताे. राज्यपाल हे राष्ट्रपती राजवटीबाबत आढावा घेऊन त्यासंर्दभात निर्णय घेत असतात असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.  We don’t demanded president rules in Maharashtra says BJP state president chandrakant patil

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच पॅरामीटर बदलत आहे.सत्तेत असणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करतात हा नवा पायंडा घालण्यात आला आहे. माेहित कंबाेज यांच्या गाडीवरील हल्ला, पाेलखाेल यात्रेच्या रथावर दगडफेक प्रकार त्याचप्रमाणे राणा दांम्पत्या विराेधात शिवसेनेचा हाय व्हाेलटेज ड्रामा सुरु आहे. ज्याप्रकारे हे प्रकार सुरु आहे ते सामान्य माणसाला समजेनासे झाले आहे.भाजप याचा निषेध व्यक्त करते. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था संपूर्णपणे बिघडल्याचे यातून दिसून येत आहे.

हनुमान चालिसाला विराेध करण्यात काहीच कारण नाही. अमरावतीचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा असलेले राणा दांम्पत्य माताेश्री बाहेर हनुमान चालिसा म्हणणारा अशी घाेषणा झाल्यानंतर त्यांना शिवसेना विराेध करत आहे. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी त्यांनी राणा दांम्पत्याला सांगितले पाहिजे हाेते की, घरासमाेर कशाला हनुमान चालिसा म्हणता घरात या आणि म्हणा. खुर्ची, प्रसाद व्यवस्था करा, ज्या मारुतीला शक्तीचे केंद्र म्हणून आपण पाहताे त्याच्या स्त्राेतचे स्वागत केले पाहिजे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून सरकारच्या माध्यमातून दडपशाही करायची तर दुसरीकडे रस्त्यावर कार्यकर्ते उतरुन आंदोलन करावयाचे हे याेग्य नाही. राणा दांम्पत्य अपक्ष लाेकप्रतिनिधी असून हे त्यांचे आंदोलन असल्याने भाजप कार्यकर्ते त्यांच्या आंदोलन ठिकाणी दिसत नाही.



गृहमंत्री चपात्या भाजतात का?

राणा दांम्पत्य राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वक्तव्य केले याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, गृहमंत्री मग काय चपात्या भाजतात का? गृहमंत्री सांगतात कायदा व सुव्यवस्था निर्माण हाेताे मग तुम्ही राजीनामा द्या. शिवसेना बसली आहे त्यांचा गृहमंत्री करण्यासाठी त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या. साैजन्य व संयम आता आमचा सुटला आहे असे टिव्ट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले त्यासंर्दभात पाटील म्हणाले, काेणाला धमक्या देत आहे, तुम्हाला काय करायचे आहे ते करा.

भारनियमन कृत्रिम संकट

राज्यात करण्यात येत असलेले वीजेचे भारनियमन हे कृत्रिम संकट आहे. खासगी कंपन्याकडून चढया दराने वीज खरेदी करुन दलाली मिळविणयाचा प्रयत्न आहे. राज्यातील शेतकरी पुरेशी वीज मिळत नसल्याने हवालदिल झालेला आहे. भारनियमन विराेधात राज्यभरात आम्ही आंदोलन करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

We don’t demanded president rules in Maharashtra says BJP state president chandrakant patil

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात