प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी जशी अपक्ष आमदारांची मते महत्वाची आहेत, तशीच छोट्या छोट्या पक्षांची मतेही महत्वाची भूमिका बजावणार आहेत. Hitendra Thakur’s Bahujan Vikas Aghadi won by 3 votes
त्यात बहुजन विकास आघाडीची 3 मतेही महत्वाची ठरणार आहेत. सध्या जरी या बहुजन विकास आघाडीचा ठाकरे – पवारांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा असला तरी राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र बविआ त्यांची ३ मते भाजपाला देईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर राज्यसभेच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी बहुजन विकास आघाडीची 3 मते भाजपला मिळणार असल्याचा दावा केला आहे.
बविआचा निर्णय गुलदस्त्यात
राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता, मात्र तो अपयशी ठरला. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांनी अपक्षांची मते आणि छोट्या पक्षांची मते जमवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात कांटे की टक्कर आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराची मते महत्त्वाची ठरणार आहेत.
त्यामुळे सध्या पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत. त्यामुळे ही तीन निर्णायक मते कुणाला मिळणार याबाबत आता तर्कविर्तक लावले जात आहेत. ही तीन मते कुणाला हे अजून, हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट केलेले नाही. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील असे 3 आमदार बहुजन विकास आघाडीकडे आहेत.
शिवसेनेचा राग काढणार!
2019 च्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा येथून बविआचा उमेदवार क्षितिज ठाकूर उभे राहिले होते, त्यांच्या विरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मांना उमेदवारी देऊन त्यांना तगडा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा वचपा बविआ राज्यसभेच्या निवडणुकीत काढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App