मॅजिक ऑफ 39 : भारताला लोकशाही शिकवण्याचा दंभ बाळगणाऱ्या ब्रिटनमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती!!


मॅजिक ऑफ 39 : भारताला लोकशाही शिकवण्याचा दंभ बाळगणाऱ्या ब्रिटनमध्ये भारतातल्याच एका राज्याच्या राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या 39 आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करून त्यांची सत्ता घालवली आणि आपले नेते एकनाथ शिंदे यांची सत्ता आणून दाखवली. तसाच अनुभव ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आला आहे. गेल्या 24 तासात बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील 39 मंत्र्यांनी राजीनामा देऊन खुद्द पंतप्रधान जॉन्सन यांच्यावरच राजीनामाची पाळी आणली आहे. हेच ते बोरीस जॉन्सन आहेत, जे गेल्याच महिन्यात भारतात येऊन बुलडोझर वर चढून पोज देऊन फोटो काढून गेले होते. History of maharashtra politics repeated in Britain, PM Boris Johnson had to quit like Uddhav Thackeray

पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासांत 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे जॉन्सन पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचा दबाव वाढला. त्यानंतर बोरिस जाॅन्सन यांनी अखेर हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, तूर्तास तरी जाॅन्सन पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आता ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे प्रख्यात भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ते पंतप्रधान झाले तर ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदी भारतीय वंशाचे पंतप्रधान सत्तेवर बसणार आहेत. ब्रिटिशांच्या वंश श्रेष्ठत्वाच्या दंभ आणि अहंकाराला यातून धक्का बसणार आहे.


Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??


ब्रिटनमध्ये राजीनाम्यांची लाईन

भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर जॉन्सन यांच्या सरकारमधून राजीनाम्याची लाट उसळली. जाॅन ग्लेन, प्रीति पटेल, ग्रॅंट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले. तर, काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली. महाराष्ट्रात जसे उद्धव ठाकरे स्वकीयांच्या जाळ्यात अडकले तसेच बोरीस जॉन्सन ब्रिटनमध्ये स्वकीयांच्या जाळ्यात अडकले. त्यातून सुटण्याचा मार्ग सापडेना म्हणून संसदेतल्या गटनेते पदाचा राजीनामा देऊन जॉन्सन मोकळे झाले.

– हे आहे कारण

महाराष्ट्रात जसे उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांच्या मतदारसंघातला विकास थांबला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थमंत्री यांनी स्वतःच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी शिवसेना आमदारांना कमी निधी दिला. नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना हा पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, असे अनेक आरोप करत 39 आमदार बाहेर पडले तसेच काहीसे आरोप ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यावर त्यांच्याच सहकारी मंत्र्यांनी लावले आहेत.

ब्रिटनमध्ये महागाईने मागील 40 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढल्याने नाराजी वाढली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पण बोरीस जॉन्सन त्याकडे काही लक्ष न देता ते सेक्स स्कॅण्डल मध्ये अडकले. त्याचा दुष्परिणाम सत्ताधारी हुजूर पक्षाला भोगाव लागला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत हुजूर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचे खापर बोरीस जॉन्सन यांच्यावरच फुटले आहे. त्याचबरोबर कोरोना काळात बोरीस जाॅन्सन यांच्या घरी नियमांचे उल्लंघन करुन झालेल्या पार्टीमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

परिणामी जॉन्सन मंत्रिमंडळातील 39 मंत्र्यांनी राजीनामा देऊन आता खुद्द बोरीस जॉन्सन यांनाच घरी पाठवण्याची तयारी केली. महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडले तेच ब्रिटनमध्ये बोरीस जॉन्सन नावाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत घडलेले दिसत आहे. या विलक्षण योगायोगाचा आकडा 39 आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात 39 आमदारांनी बंड केले. ब्रिटनमध्ये बोरीस जॉन्सन यांच्या विरोधात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले.

History of maharashtra politics repeated in Britain, PM Boris Johnson had to quit like Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती