हिजाब वाद : आदित्य ठाकरेंनी मांडली शालेय गणवेशाच्या बाजूने आणि काँग्रेस विरोधात भूमिका!!


प्रतिनिधी

मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार मधले पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.शाळा आणि महाविद्यालयांनी ठरवलेले गणवेशच विद्यार्थ्यांनी वापरले पाहिजेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षणावरच भर हवा. कुठल्याही धार्मिक आणि राजकीय वादाशी त्याच्याशी संबंध असता कामा नये, असे आदित्य ठाकरे म्हणाले.Hijab controversy: Aditya Thackeray’s role in favor of school uniform and against Congress

आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका मांडल्यामुळे एक प्रकारे त्यांनी कर्नाटकातल्या भाजपा सरकारचे समर्थन केल्याचेच मानण्यात येत आहे. त्याच वेळी त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी हिजाब बाबत मांडलेल्या काँग्रेसच्या भूमिकेविरोधात शिवसेनेची भूमिका मांडल्याचे देखील स्पष्ट होत आहे. हिजाब घालायचा की बिकिनी घालायची, हे महिलांना महिलांचे ठरवूद्यात, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले होते.



कर्नाटकात हिजाब परिधान करुन आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना तेथील महाविद्यालयाने बंदी घातली. याचे पडसाद देशभर उमटत आहेत. याबाबत काही राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ठरवून दिलेले गणवेशच विद्यार्थ्यांनी परिधान करावेत. शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ आणि केवळ शिक्षणालाच महत्व दिले पाहिजे. धार्मिक किंवा राजकीय विषयांपेक्षा फक्त शालेय विषयांकडेच लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

 उडूपीत सुरू झालेला वाद

कर्नाटक राज्यातील उडूपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीआहे. हिजाब घालू न देणे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा त्यांचा दावा आहे.

 महाराष्ट्रात उमटले पडसाद

कर्नाटकातील या घटनेचे पडसाद राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. मालेगाव शहरात शुक्रवारी हिजाब दिवस पाळला जाणार आहे. यादिवशी सर्व महिला बुरखा परिधान करतील, असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

Hijab controversy: Aditya Thackeray’s role in favor of school uniform and against Congress

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात