विवाहित महिलेवर ‘I Love U’ लिहिलेले पत्र फेकणेही गुन्हाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

High Court clarifies that love letter throwing on a married woman is a crime of molestation

Crime Of Molestation : एखाद्या विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहून वा एखादे प्रेमपत्र फेकणे किंवा कोणतीही शायरी अथवा कविता फेकणे हा गुन्हा मानला जाईल. असे केल्याने विनयभंग किंवा लैंगिक छळाची केस होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील 2011 च्या घटनेची सुनावणी करताना दिला. एका 54 वर्षीय व्यक्तीवर 45 वर्षीय महिलेला अश्लील कृत्य करून धमकी दिल्याचा आरोप होता. High Court clarifies that love letter throwing on a married woman is a crime of molestation


विशेष प्रतिनिधी

नागपूर : एखाद्या विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहून वा एखादे प्रेमपत्र फेकणे किंवा कोणतीही शायरी अथवा कविता फेकणे हा गुन्हा मानला जाईल. असे केल्याने विनयभंग किंवा लैंगिक छळाची केस होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील 2011 च्या घटनेची सुनावणी करताना दिला. एका 54 वर्षीय व्यक्तीवर 45 वर्षीय महिलेला अश्लील कृत्य करून धमकी दिल्याचा आरोप होता.

विनयभंग किंवा महिलांचा छळ केल्याप्रकरणी आरोपीविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. दोषी ठरल्यास त्याला एकतर दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिली जाते किंवा दंड किंवा दोन्हींची शिक्षा होऊ शकते.

काय आहे प्रकरण?

अकोला जिल्ह्यात सन 2011 मध्ये घडलेल्या या घटनेवर नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. एका 54 वर्षीय व्यक्तीवर 45 वर्षीय महिलेला त्रास देण्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप होता. पीडित महिला विवाहित आहे. त्यांना एक मुलगा आहे. आरोपीने पीडितेला प्रेमपत्र दिले होते. पीडितेने ते प्रेमपत्र घेण्यास नकार दिला होता.

विवाहित महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने हे पत्र तिच्या अंगावर फेकले आणि तिला मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले. यासोबतच त्याने हे कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात कोर्टाने स्पष्ट केले की, विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र किंवा कविता व्यक्त करणारे पत्र फेकणे म्हणजे लैंगिक छळ आणि विनयभंग आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

याप्रकरणी प्रथम अकोल्याच्या सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. प्रथम श्रेणीच्या दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला दोन वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानेही आरोपीला दोषी ठरवले. माननीय न्यायालयाने म्हटले, ‘स्त्रीचा सन्मान हा तिचा सर्वात मोठा दागिना आहे. स्त्रीच्या सन्मानाशी छेडछाड झाली किंवा तिचा छळ केला गेला आहे, याचा विचार केला पाहिजे. यामुळे उघडपणे स्पष्टीकरण दिले जाऊ शकत नाही, ते परिस्थितीवर अवलंबून असते. पण 45 वर्षांच्या विवाहित महिलेच्या शरीरावर प्रेम व्यक्त करणाऱ्या कवितेत लिहिलेले पत्र फेकणे हे लैंगिक छळ आणि विनयभंगाचे प्रकरण आहे,” असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

High Court clarifies that love letter throwing on a married woman is a crime of molestation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात