वादळ, पूर आणि ढगफुटीसारख्या घटना भारतीय उपखंडात अधिकच वाढणार; हिमनद्यांच्या अभ्यासकाने दिला धोक्याचा इशारा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय उपखंडात वादळ, पूर आणि ढगफुटीसारख्या घटना वाढणार असल्याचा गर्भित इशारा हिमनद्यांचे अभ्यासक पॉल मायेव्स्की यांनी दिला आहे. Incidents like storms, floods and cloudbursts will increase in the Indian subcontinent; warns Glacier experts

जागतिक तापमानवाढीमुळे आर्कटिक, अंटार्कटिक आणि एव्हरेस्टचा बर्फ वितळत असल्यामुळे अशा घटना वाढल्या आहेत. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील अनादी काळापासून साचलेला बर्फ आता वितळू लागला आहे. हा हवामान बदलाचा परिणाम ५० ते ९० वर्षानंतर दिसेल, असे भाकीत होते. परंतु आता हा विनाश १०- २० वर्षातच दिसण्याची शक्यता आहे.

भारतीय उपखंडात पूर-दुष्काळ का वाढणार ?

भारतात दक्षिण आणि पश्चिम भागात आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहेत. परंतु काही वर्षांपासून आर्क्टिक ध्रुवावरुनही भारतामध्ये ओलावा पोचत आहे. याचे कारण म्हणजे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि हिमालयातील हिमनद्या वितळू लागल्या आहेत. हवामान बदलामुळे त्या सर्वाधिक प्रभावित होत आहेत. जगातील तापमान वाढ १.५ अंश असताना, या क्षेत्रांमधील तापमानवाढ ४ अंशांपर्यंत गेली आहे. बर्फ वेगाने वितळत असल्यामुळे त्याच्या ओलाव्यासह वारे हिमालयाच्या उत्तर आणि दक्षिण दिशेने वेगाने वाहत आहेत. जेव्हा हे थंड वारे सखल भागातील उबदार वाऱ्यांसोबत मिसळतात, तेव्हा वादळ तयार होते. त्यामुळेच भारतात वादळी पाऊस आणि पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. दुसरीकडे जंगल कमी झाल्यामुळे पाऊस जमिनीत मुरण्याऐवजी तो मातीला घेऊन नद्यांसोबत मिसळत आहे. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी थोडा जरी पाऊस झाला तरी पूर परिस्थिती तयार होत आहे. दुसरीकडे पाऊस थांबताच नद्यांमधील प्रवाह पूर्णपणे थांबून नदी कोरडी पडत आहे.



परिस्थिती किती वेगाने बदलतेय ?

९० च्या दशकात वाटायचं की, हवामान बदलाचा परिणाम ५० ते ९० वर्षानंतर दिसेल. पण, आता हा १०-२० वर्षातच दिसण्याची शक्यता आहे. ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. ढगफुटी होणे म्हणजे वातावरणातील आद्रता वाढून प्रचंड पाऊस पडणे. जगातील तापमान वाढीमुळे अनेक ठिकाणी या घटना घडत आहेत. यामळे मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानी देखील होत आहे.

दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार ?

बर्फाळ प्रदेशातील बर्फ एखाद्या स्पंजप्रमाणे प्रदूषण शोषून घेत असतो. पण, बर्फ वितळत असल्यामुळे दुषित घटक नद्यांमध्ये जमा होऊन नद्यांनाही दुषित करतोय. याचा आपल्यावरही परिणाम होतो. तसेच बर्फाचा रंगही राखाडी होऊ लागला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता आता बर्फातच साचून राहत आहे.

हवामान बदलाचे सर्वात वाईट स्वरूप कोणते ?

जगातील लाखो टन मिथेन वायू बर्फाखाली जमा आहे. जर पर्माफ्रॉस्ट नावाचा बर्फाचा थर वितळून मिथेन वातावरणात आला तर तो वातावरणाची उष्णता ३० ते ४० पट वाढवू शकतो. वाढत्या उष्णतेमुळे जगातील बर्फाचे आवरण वितळून समुद्राची पातळी ७० मीटरपर्यंत वाढू शकते. यामुळे समुद्राजवळ राहणाऱ्यांना पाण्याचा आणि जे समुद्राच्या जवळ राहत नाहीत त्यांना तीव्र दुष्काळ, जंगलातील आग आणि धुळीच्या वादळांना सामोरे जावे लागेल.

Incidents like storms, floods and cloudbursts will increase in the Indian subcontinent; warns Glacier experts

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात