ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना; वैदिक मंत्रोच्चारात समतेचा गजर!!

Kalaram temple

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक येथील पवित्र श्री काळाराम मंदिर येथे धर्मध्वज स्थापना समारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक पूजा विधी आणि भक्तांच्या जयघोषात माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, स्वामी श्री. गोविंददेव गिरी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली.Kalaram temple; A cry of equality in the chanting of Vedic mantras!!

यावेळी श्री काळाराम मंदिरात श्रीराम महायज्ञ आयोजित केला होता. यामध्ये नाशिकचे माजी खासदार आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब गायकवाड यांच्या कुटुंबीयांमधील सदस्य सहभागी झाले. यावेळी वैदिक मंत्रोच्चारात समतेचा गजर करण्यात आला.



या प्रसंगी उपस्थित मान्यवर, संत-महंत आणि भाविकांनी सनातन धर्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेला हा सोहळा अक्षरशः राममय झाला होता.

त्यानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेल्या गोदावरी महाआरती मध्ये रामनाथ कोविंद आणि त्यांचे कुटुंबीय त्याचबरोबर विजयाताई रहाटकर सहभागी झाले.

Kalaram temple; A cry of equality in the chanting of Vedic mantras!!

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात