मुसळधार पावसाने पुणेकरांना झोडपले, अनेक घरांत घुसले पाणी


मुसळधार पावसाने पुणेकरांना शनिवारी अक्षरशः झोडपून काढले.पावसामुळे रस्त्यावर प्रचंड पाण्याचे लोंढे वाहत होते.अनेक ठिकाणी झाडे पडली.


विशेष प्रतिनिधी

पुणे : मुसळधार पावसाने पुणेकरांना शनिवारी अक्षरशः झोडपून काढले.पावसामुळे रस्त्यावर प्रचंड पाण्याचे लोंढे वाहत होते.अनेक ठिकाणी झाडे पडली.Heavy rains lashed Pune, flooding many houses

पावसाने दाणादाण उडवली असून अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक चौकांमधील आणि रस्त्यांवरील चेंबरमधून मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर आले.

येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे पाणी साचल्याच्या घटना घडल्या. वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे झाडे पडली.
पिसोळी ग्रामपंचायत जवळ असलेल्या एका सोसायटीच्या गेटवर वीज पडून आग लागल्याची घटना घडली. घराशेजारील इलेक्ट्रिक पोलवर वीज कोसळली. तेथे जवळच असलेल्या मीटर बॉक्सने पेट घेतला.

शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. अनेक रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते. शहराच्या सर्व भागात पाऊस पडत होता.

Heavy rains lashed Pune, flooding many houses

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर