Health Minister Rajesh Tope : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारी भरतीमधील पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात ते बोलत होते. Health Minister Rajesh Tope says that private institutions no longer have examination contracts
प्रतिनिधी
जालना : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारी भरतीमधील पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात ते बोलत होते.
राजेश टोपे म्हणाले की, आरोग्य भरतीतील परीक्षांबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून पुनर्परीक्षेबाबत पोलीस तपास अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असून यापुढे परीक्षेत असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील.
ते पुढे म्हणाले की, आमचा हेतू हा आरोग्य सेवा देण्याचा असून आमचा हेतू शुद्ध आहे. आरोग्य विभाग परीक्षा पेपरफुटीचा तपास पोलीस योग्य पद्धतीने तपास करत असून सीबीआय चौकशीची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इथून पुढे राज्यात खासगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही, परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यातील ओमायक्रॉनच्या संसर्गावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे, त्यामुळेच काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे.
Health Minister Rajesh Tope says that private institutions no longer have examination contracts
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App