Hartalika 2021: काय आहे हरतालिका पूजेचे महत्व? शुभ मुहूर्त ; कशी केली जाते पूजा?…जाणून घ्या सविस्तर एका क्लिकवर

हरतालिका पुजेसाठी नेमका मुहूर्त काय आणि त्याची पूजा विधी याविषयी जाणून घ्या सविस्तरपणे.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : 10 सप्टेंबर 2021 पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 9 सप्टेंबर 2021 रोजी (गुरूवार) हरतालिकेचा सण साजरा केला जाणार आहे. हे व्रत महिला करतात. यावेळी माता पार्वती आणि शंकराची पूजा केली जाते. Hartalika Vrat Shubh Muhurat 2021 : read more

शास्त्रात या व्रताचं महात्म्य मोठं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच महिला आणि कुमारिका हरतालिकेचं पूजन करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीया म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत हरतालिकेची पूजा करता येणार आहे. सकाळी साडे सहा वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत या पुजेचा मुहूर्त असणार आहे. दरम्यान, हरतालिकेच्या पूजेसाठी दिवसभर उपवास देखील केला जातो. हा उपवास मध्यरात्री 12 वाजता सोडला जातो.

हरतालिकेची पूजा कशी करावी?

पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार, महिला भल्या सकाळीच उठून नदी किनारी जाऊन तेथील माती घेऊन येतात. मात्र आता तसं शक्य नसल्याने जवळच असणाऱ्या पाणवठ्याजवळील माती आणून त्याची पिंड बनवली जाते. यामध्ये 5 खडे हे गौरी पूजेसाठी ठेवले जातात. त्यानंतर माता पार्वती आणि शंकर यांची पूजा केली जाते. यावेळी शंकराला बेलपत्र अर्पण केली जातात.तर पार्वती मातेला आणि शिवलिंगाला कापसाचे वस्त्र परिधान केलं जातं. त्यानंतर 16 वेगवेगळ्या झाडांची पानं आणून ती इथे वाहिली जाता. ही पूजा आटोपल्यानंतर नैवेद्य अर्पण करतात आणि त्यानंतर आरती करण्यात येते.

हरतालिकेच्या दिवशी काही महिला निर्जळी उपवास करतात. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी महिला आपल्या या व्रताची सांगता करतात. यावेळी पुन्हा शिवलिंग आणि पार्वती मातेची पूजा करून आरती केली जाते. ज्यानंतर शिवलिंग आणि पार्वतीच्या मूर्ती या पाण्यात विसर्जित करण्यात येतात.

हरतालिकेची नेमकी अख्यायिका काय आहे?

भगवान शंकराची पती म्हणून प्राप्ती होण्यासाठी माता पार्वतीनं घोर तपश्चर्या केली होती. यासाठी तिने हरतालिकेचं व्रत केलं होतं. माता पार्वतीची कठोर तपस्या आणि व्रत यावर प्रसन्न होऊन शंकरानं माता पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. अशी अख्यायिका सांगितली जाते.

यामुळेच हरतालिका व्रत कुमारीका आपल्या मनासारखा पती मिळावा यासाठी करतात. तर विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे व्रत करतात.

Hartalika Vrat Shubh Muhurat 2021 : read more

महत्त्वाच्या बातम्या