विशेष प्रतिनिधी
मुंबई: भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील नेत्यांच्या तपास सुरू केला आहे. इडीने शरद पवार यांना देखील नोटीस बजावून चौकशी केली होती.
Harshvardhan Patil’s statement after joining BJP and regarding ED enquiry creates question mark
ईडी, आयकर विभाग, सीबीआय, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी करत आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप भाजपा मात्र फेटाळून लावत आहे. पूर्वी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेलेत. त्यांनी आता केलेले विधान चर्चेत आले आहे.
ED Raid Ajit Pawar : सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे तरीही उपमुख्यमंत्री म्हणतात…माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले?
विधानसभा निवडणुकांपूर्वी हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. एका खासगी कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील भाजपा नेते म्हणून उपस्थित होते. यावेळी भाजपाचे अनेक नेते व पदाधिकारी तिथे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी याठिकाणी राजकीय नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी विधान केले आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर काय बदल घडला याबद्दल बोलताना ते म्हणाले, तिथे आमदार साहेब म्हणाले, “मी आहे तिथे सुखी आहे तुम्ही दिल्या घरी सुखी रहा.” तुम्ही भाजपमध्ये का गेलात?” त्यावर मी त्यांना म्हणालो की तुमच्या नेत्यांनाच विचारा, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेले. पण मी आता सांगतो की, “मी इथे मस्त आणि निवांत आहे.” भाजपमध्ये असल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही काही नाही. फार मस्त वाटतंय.” असे पाटील म्हणाले.
शिवसेना खासदार राऊत म्हणाले की, “हर्षवर्धन पाटील यांचे विधान वाचले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले हे नेते आता भाजपमध्ये आहेत. ते म्हणतात की भाजपमध्ये गेले की शांत झोप लागते. चौकशी होत नाही. या त्यांच्या एका वाक्यातच सगळे काही समजते.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App