स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा विवाह शाही थाटात मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झाला. या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत.Harshvardhan Patil’s daughter became the Thackeray’s daughter-in-law, Ankita and Nihar Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा विवाह शाही थाटात मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झाला. या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत.
अनेक दिवसांपासून या विवाहाची चर्चा होती, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना लग्नासाठी निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील दोघेही गेले होते, त्या फोटोचीही बरीच चर्चा होती.
पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून!!; राज ठाकरेंना पहिली पत्रिका पाटलांकडून!!
अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि एक वर्ष लंडन येथील हॉवर्डमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच त्या इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या सदस्या आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. ते वकीली करतात. निहार यांचे वडील बिंदुमाधव यांचं १९९६ मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे चुलत काका आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App