पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून!!; राज ठाकरेंना पहिली पत्रिका पाटलांकडून!!


प्रतिनिधी

पुणे : सध्या सगळीकडे सेलिब्रिटी लग्नांचा धडाका उडालेला असताना आणखी एक सेलेब्रिटी लग्न लवकरच होणार आहे. पाटलांची लेक ठाकरेंची सून होणार आहे…!!Nihar Thackeray – Ankita Patil Wedding soon

इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हिचा विवाह शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र कै. बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार यांच्याशी होणार आहे.अर्थात हे ठाकरे – पाटील या दोन राजकीय घराण्यांचे मिलन नसून निहार ठाकरे आणि अंकिता पाटील हे परदेशात शिकत असताना त्यांचे प्रेम जमले. याची बातमी झी24 तास वृत्तवाहिनीने दिली आहे.

त्या दोघांनी आपापसांत लग्न करायचे ठरवून आपल्या कुटुंबियांना सांगितले आहे. ठाकरे आणि पाटील दोन्ही कुटुंबीयांनी याला मान्यता दिली असून लवकरच हा विवाह सोहळा होणार आहे.

ठाकरे कुटुंबीयांच्या घरचा हा विवाह सोहळा असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पहिली पत्रिका मात्र पाटलांच्या घरातून दिली देण्यात आली आहे.

हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी आज सकाळी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पत्रिका दिल आगत्याचे निमंत्रण दिले.या ठाकरे – पाटील विवाहातून महाराष्ट्राच्या दोन राजकीय घराण्यांचे वेगळ्या प्रकारचे नाते आता जनतेसमोर येणार आहे.

Nihar Thackeray – Ankita Patil Wedding soon

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती