गुटखा – पानमसाला हवे ते खा , पण डोक शांत ठेवा ; जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत


राज्यात गुटखा बंदी असताना आव्हाड असे वक्तव्य कसे करू शकतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. Gutkha – Eat what you want with Panamsala, but keep your head calm – Jitendra Awhad


विशेष प्रतिनिधी

भिवंडी : शुक्रवारी भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आव्हाड यांनी जनतेला डोके शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा पानसुपारी खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं हे वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.राज्यात गुटखा बंदी असताना आव्हाड असे वक्तव्य कसे करू शकतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.नेमक काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

भिवंडीमध्ये बोलताना आव्हाड यांनी म्हटले आहे की, मी मुस्लीम बांधवांना विनंती करतो की, त्यांनी शांत राहावे, डोके गरम करून घेऊ नये. विरोधकांना तुमची डोके भडकवयाची आहेत. त्यामध्ये त्यांचा मोठा राजकीय स्वार्थ आहे. पण तुम्ही शांत रहा. डोके थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा,तोंडात रजनीगंधा, गुटखा, पानमसाला हवे ते ठेवा, मात्र शांत रहा असे आव्हाड यांनी म्हटले आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तृळात उलट सूलट चर्चा रगल्याचे पहायला मिळत आहे.

Gutkha – Eat what you want with Panamsala, but keep your head calm – Jitendra Awhad

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण