गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक; सोलापूरातील पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचा राडा


प्रतिनिधी

सोलापूर : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सोलापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडने राडा घातला. सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्तेंविरोधात संताप व्यक्त करून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शाई फेकली. Gunaratna Sadavartenvar ink throw sambhaji brigade in solapur

शुक्रवारी गुणरत्न सदावर्ते हे उस्मानाबादमध्ये होते. स्वंतत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कालही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सदावर्तेंचा निषेध नोंदवला होता. मात्र आज, शनिवारी सोलापूरमध्ये सदावर्ते यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी सुरू असताना काही कार्यकर्त्यांना सदावर्तेंवर शाई फेकली.



 शाईफेकीनंतर सदावर्ते आक्रमक

या प्रकारानंतर सदावर्ते अधिक आक्रमक झाले. ते म्हणाले, आज संविधान दिनी हे वागणं चुकीचे आहे. आम्ही शिवरायांचे खरे मावळे आहोत. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वातंत्रवीर सावरकर ज्या जेलमध्ये होते. तेथे आम्ही उपवास करून आलेली माणसं आहोत. पाकिस्तानच्या सीमेवर आमचे भाऊ असतात आणि पाकिस्तानला डोळेवर करून सुद्धा पाहू देत नाहीत. त्या वंशावळीतून आम्ही आलो आहोत. तेव्हा या सर्व गोष्टी आम्हाला पाणी कम चाय आहेत. आम्ही त्यांचा धिक्कार करतो. आम्हाला शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची कीव येते, असेही सदावर्ते म्हणाले.

संविधान दिनी, संविधान दिनाच्या बाबतीत बोलत असताना, छत्रपती शिवरायांची प्रतिमा माझ्या हातात होती. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवरही काळी शाई टाकली. हे काम करणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आम्ही आशा लोकांना घाबरत नाही. या लोकांना आम्ही उत्तर देऊ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगेन राज्यात जे असंवैधानिक वागण्याची आधीच खबरदारी घेतली पाहिजे, असेही सदावर्ते म्हणाले.

 Gunaratna Sadavartenvar ink throw sambhaji brigade in solapur

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात