अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत होणार वाढ – पुणे पोलिसही ताबा घेण्याची शक्यता


मुंबईतील शरद पवार यांच्या निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुनरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेतल्यानंतर आता पुण्यात सदावर्तेवर दाखल असलेला गुन्हा समोर आला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – मुंबईतील शरद पवार यांच्या निवास स्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुनरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेतल्यानंतर आता पुण्यात सदावर्तेवर दाखल असलेला गुन्हा समोर आला आहे. या गुन्ह्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत होणार असल्याचे दिसत असून पुणे पोलिसही तपासाठी ताबा घेण्याची शक्यता आहे.Advocate gunratna sadavarte now radar on pune police, in bharti vidyapith police station case is registered against sadavarte

सातारा व कोल्हापूर येथील राजे असलेल्या खासदाराविषयी आक्षेपार्ह वकत्व्य केल्याच्या आरोपावरून अ‍ॅड. सदावर्ते यांच्य विरूध्द पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पुणे पोलिस करीत



असून याप्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी नुकताच गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपासासाठी त्याचा ताबा पुणे पोलिस घेण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांना शुक्रवारी सातारा न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांचा केव्हाही ताबा पुणे पोलिस घेऊ शकतात. त्यामुळे अ‍ॅड. सदावर्तेच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातारा, पुणे आणि नाशिक येथे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

Advocate gunratna sadavarte now radar on pune police, in bharti vidyapith police station case is registered against sadavarte

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात