विमानतळ सुरू झाल्याने शिर्डी सह स्थानिक काकडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.Good news for Sai devotees; Chennai to be followed by Delhi-Shirdi flights
विशेष प्रतिनिधी
शिर्डी : कोरोनाचा प्रभाव जस- जसा कमी होत गेला तसतसे निर्बंध शिथिल करण्यात आले. ७ ऑक्टोबर रोजी साई मंदिर भाविकांसाठी खुले झाले.दरम्यान १० ऑक्टोबर पासून शिर्डीचे विमानतळ देखील सुरू झाले. विमानतळ सुरू झाल्याने शिर्डी सह स्थानिक काकडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरुवातीला चेन्नई – शिर्डी अशी एकच विमानसेवा सुरू होती.त्यामुळे इतर शहरातून विमानसेवेला प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा होती.आता सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १० तारखेला चेन्नईहून १६७ प्रवासी घेऊन पहिले विमान शिर्डी विमानतळावर दाखल झाले.
दरम्यान मंगळवार ( दि. १२ ) रोजी दिल्लीहून स्पाईसजेट कंपनीचे विमान १३० प्रवाशांना घेऊन शिर्डीत दाखल झाले. तर हेच विमान शिर्डीहून ४० प्रवासी घेऊन दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी विमानतळाचे डायरेक्टर सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की , हैद्राबाद, मुंबई व बेंगलोर या ठिकाणाहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App