आधीच उपाशी त्यात उपवास, आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रातल्या बहुजनांना हा त्रास; पंकजा मुंडे यांचे टीकास्त्र


प्रतिनिधी

औरंगाबाद : आधीच उपाशी त्यात उपवास अशी महाराष्ट्रातल्या बहुजनांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थिती झाली आहे, असे टीकास्त्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ठाकरे – पवार सरकारवर सोडले आहे. औरंगाबाद मध्ये ओबीसी जनजागरण मेळाव्यात त्या बोलत होत्या.Already starving in it, this trouble to the Bahujans in Maharashtra during the Agadhi government; Pankaja Munde’s Tikastra

ठाकरे – पवार सरकारच्या राजवटीत ओबीसींचे राजकीय आरक्षण कशाप्रकारे संपवण्यात आले याची अनेक उदाहरणे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात दिली. जो संख्येने अधिक आहे तो बहुजन ही व्याख्या असताना महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची बहुजनांची व्याख्या मात्र स्वतःच्या राजकीय पक्षाभोवतीच केंद्रित आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.



महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असे नुसते बोलत राहते. प्रत्यक्षात इथे काही विशिष्ट राजकीय घराण्यांचे सरकार आहे, असा हल्लाबोल देखील पंकजा मुंडे यांनी केला. आजही जातीपातीच्या नावाखाली गावागावांमध्ये स्त्रियांवर, मुलांवर अत्याचार सुरू आहेत.

जातीपातीच्या भिंती मोडून काढण्याऐवजी त्या अधिक भक्कम केल्या जात आहेत आणि त्यातून स्वतःच्या मतांचे राजकारण फुलवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातले हे चित्र सर्वसामान्य युवकाने आदर्श घेण्यासारखे राहिलेले नाही असेही त्या म्हणाल्या.

जातिवादासाठी जात नाही तर ताकद देण्यासाठी जात आहे आणि दुर्बल घटकांसाठी आरक्षण आहे, याची आठवण पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात करून दिली. ओबीसींचे आरक्षण परत मिळविल्याशिवाय राहणार नाही. हे आरक्षण परत दिले नाही तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

Already starving in it, this trouble to the Bahujans in Maharashtra during the Agadhi government; Pankaja Munde’s Tikastra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात