विशेष प्रतिनिधी
बीड : एसटी कर्मचारी आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. आज बीडच्या एसटी आगारातील विविध समाज बांधवांनी एकत्र येत आपलं गाऱ्हाणं मांडले आहे. देवा ठाकरे – पवार सरकारला एसटीच्या विलीनीकरणासाठी बुद्धी दे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. God, Give wisdom to the Thackeray – Pawar government : St empolyes
बीड आगारातील एसटी कर्मचारी मागील पंधरा दिवसांपासून आंदोलन करत आहे. दररोज आंदोलन करत हे कर्मचारी शासन दरबारी म्हणणं पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. गुरुवारी मात्र आंदोलनाला भावनिकतेची जोड देत सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
हिंदू बांधवांनी लक्ष्मी पूजन, भागवत गीता वाचन करून विधिवत पूजा केली. मुस्लिम बांधवांनी दुआ अदा केली, तर बौद्ध धर्मियांनी बुद्धवंदना केली. सरकारने गांभीर्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजावून घेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा एकही कर्मचारी सेवेत रुजू होणार नाही. असे पुन्हा कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App