विशेष प्रतिनिधी
मुंबई – १५ वर्षांच्या मुलीने अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आईची कराटेच्या कापडी पट्ट्याच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आईने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी मुलीने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून तिच्याच मोबाईलवरून नातेवाईकांना जीवन संपवत असल्याचा संदेश पाठवल्याचेही पोलिस तपासात आढळून आले आहे.Girl killed her mother on study issue
मुलीने डॉक्टर व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे आईने मुलीला मे महिन्यात ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी सुरू केली होती. अभ्यासात मुलीने सातत्य ठेवावे म्हणून ती तिच्यावर कायम दबाव आणत होती. त्यावरून मुलीचे तिच्याशी नेहमी भांडण होत होते.
३० जुलै रोजी आईने पुन्हा मुलीला अभ्यास न केल्याने मारहाण सुरू केली. तिने मुलीसमोर सुरी धरल्याने दोघांमध्ये वाद झाला. मुलीने आईला प्रतिकार केला. झटापटीत आईने हाताच्या पंजाचा चावा घेतल्याने मुलीने तिला ढकलून दिले.
खाटेचा कोपरा लागल्याने आई बेशुद्ध पडली. त्याही अवस्थेत आईने कराटेचा पट्टा हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीनेच तो पट्टा हातात घेऊन आईच्या गळ्याभोवती आवळत तिची हत्या केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App