वृत्तसंस्था
सेऊल : अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर युद्धसराव करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोग यांच्या बहिणीला संताप अनावर झाला आहे. दक्षिण कोरियाने अमेरिकेसोबत युद्धसराव केला तर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल , असा इशारा दिला आहे.US meter exercise with South Korea; The sister of North Korean dictator Kim Jong Is angry
उत्तर आणि दक्षिण कोरिया एकमेकांचे शेजारी असून ते पक्के वैरी आहेत. कोणत्याही कारणावरून ते एकमेकांना पाण्यात पाहत आले आहेत.अमेरिकेबरोबर दक्षिण कोरियाचा युद्धसराव म्हणजे उत्तर कोरियावर हल्ला चढविण्याची तयारी असल्याचा आरोप किम जोग यांची बहीण किम यो जोग यांनी केला आहे.
या हल्ल्याला जोरदार जशाच तसे प्रति उत्तर दिले जाईल,असा कडक इशारा तिने दिला आहे.दक्षिण कोरिया १६ ते २७ ऑगस्ट पर्यंत अमेरिकेबरोबर संगणकीय युद्धसराव करणार आऊन त्यापूर्वी चार दिवस लष्करी सराव करणार असल्याचे वृत्त जाहीर होताच उत्तर कोरिया सतर्क झाला आहे. त्यामुळे त्यांनी खबरदारीचा उपाय आणि संरक्षण सिद्धतेच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्या नंतर जशाच तसे उत्तर देण्याची भाषा केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App